Air India Plane Crash video: एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. बोईंग ७८७ हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ क्रॅश झाले.या भीषण अपघातावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, आणि सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विमान ज्या भागात क्रॅश झालं, तिथल्या स्थानिकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, आणि आता हे व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने शेअर केले जात आहेत. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय..एकीकडे या भीषण अपघातात २४१ जणांचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान विमानाच्या अवशेषांमध्ये एक भगवत गीता सापडली आहे, पण, या पुस्तकातलं एक पानही इकडचं तिकडे झालं नाहीये. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल…
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या ढिगाऱ्यात भगवत गीतेची एक आवृत्ती सुरक्षित राहिली. व्हिडिओमध्ये एक माणूस अहमदाबाद विमान अपघातातील ढिगाऱ्यात सापडलेल्या भगवत गीतेची पाने दाखवत आहे. यावळी एक पानही इकडचं तिकडे झालं नाहीये, भगवत गीता तशीच्या तशीच असल्याचं दिसत आहे. या विमानात अपघात झालेल्यापैकी कुण्या एका प्रवाशानं प्रवासात वाचण्यासाठी ही भगवत गीता घेतली असावी मात्र क्षणात सर्वकाही संपून गेलं.
पाहा व्हिडीओ
विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास रमेश यांनी सांगितलं नेमकं काय घडलं
३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असून दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI 171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांच्यासह विमानात एकूण २४२ प्रवासी होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वास रमेश यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या ३० सेकंदांमध्येच मोठे आवाज यायला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत विमान कोसळलं. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृतदेह होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते. कुणीतरी मला पकडलं आणि रुग्णवाहिकेत नेलं आणि तिथून रुग्णालयात आणलं”, असं विश्वास रमेश यांनी सांगितलं.