जगातील अनेक लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी या लोकांनी अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील दाखवले आहेत, परंतु शास्त्रज्ञांनी अजूनतरी एलियनचे अस्तित्व ठामपणे मान्य केले नाही. आता एका व्यक्तीने एलियन्सबाबत अजब दावा केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

एनो अलारिक या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. एनो अलारिक स्वत: टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करतो. टाईम ट्रॅव्हलर म्हणजे वर्तमानातून भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करणे. त्याने याबाबत टिक टॉकवर अनेक भविष्यवाण्याही केल्या आहेत. टाईम ट्रॅव्हलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच भविष्यवाण्या शेअर केल्या आहेत. यातील सर्वात मनोरंजक भविष्यवाणी म्हणजे ८ डिसेंबरला एका महाकाय उल्कामधून एलियन्स पृथ्वीवर उतरणार आहेत. या बातमीने सर्वच हैराण झाले आहेत.

आणखी वाचा : काय सांगताय!! झोमॅटोचे सीईओ करतात चक्क होम डिलिव्हरी

डिसेंबर महिन्यात एलियन पृथ्वीवर येऊन मानवाशी संवाद साधेल असाही दावा त्याने त्याच्या भविष्यवाणीत केला. तसेच त्यांच्या दाव्यानुसार एका विशाल युएफओमधून एलियन ८ डिसेंबरला पृथ्वीवर येतील. अलीकडेच त्याने टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामुळे खळबळ उडाली. भारतात टिकटॉकवर बंदी असली तरी अनेकांनी तो व्हिडीओ इतर व्यासपीठांवरून डाउनलोड करून यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

एनोच्या पाच भविष्यवाणी

एनोने एकूण पाच भविष्यवाणी केल्या आहेत. एनो अॅल्रिकच्या मते, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखा असेल. त्यानंतर ८ डिसेंबर २०२२ रोजी एक उल्का पृथ्वीवर धडकेल, ज्यामध्ये नवीन प्रकारचे धातू आणि परदेशी प्रजाती असतील. म्हणजेच एलियन्स पृथ्वीवर येतील. यानंतर, ६ फेब्रुवारी २०२३ रोजी, ४ तरुणांना एक साधन सापडेल, जे आकाशगंगांसाठी वर्महोल उघडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे २३ मार्च २०२३ रोजी मारियाना खंदकाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला प्राचीन प्रजाती सापडतील. त्यानंतर शेवटच्या भविष्यवाणीमध्ये १५ मे २०२३ रोजी अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ७५० फूट परिसरात मोठा उल्का वर्षाव होईल, असा अंदाजही त्याने वर्तवला आहे. अशा या भविष्यवाणी आहेत. एनोने दवा केला आहे की, तो टाइम ट्रॅव्हलर असून, २६७१ सालामधून प्रवास करून परतला आहे. परंतु आपले हे दावे सिद्ध करण्यासाठी त्याने कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत.