Crocodile Attack Viral Video : मगरीच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच होय. कारण मगर जगातील सर्वात खतरनाक शिकारींपैकी एक आहे. मगर तिच्या आसपास आलेल्या प्राण्यावर किंवा माणसावर जीवघेणा हल्ला करून तडफडून शिकार करते. जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणीही तिच्यापासून चार हात लांबच राहतात. कारण मगरीच्या जबड्यात जो फसला त्याचा मृत्यू अटळ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मगरीने माणसांवर आणि प्राण्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही एका माणसाने जिवंत मगरीला स्पर्श करण्याची हिंमत केली. पण त्याच्या विनाशकाले विपरीत बुद्धीमुळे मगरीला स्पर्श करण त्याच्या चांगलंच अंगलट आलं. मगरीच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर काही सेकंदातच तिने त्या माणसावर खतरनाक हल्ला केला. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिवंत मगरीला पकडायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

एक माणूस मगरीच्या जवळ जाऊन तिच्या पाठिवर स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण मगरीच्या जवळ येऊन तिला स्पर्श करणं मगरीला काही आवडलेलं नाही. माणसाने मगरीसोबत खेळ करायला घेतला पण तो खेळ त्याच्याच अंगलट आला. कारण मगरीला स्पर्श करताच काही सेकंदातच मगरीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मगरीने त्या माणसाच्या हातावर धारदार दातांनी हल्ला केल्यांच व्हिडीओत दिस आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alligator attack video man touches crocodile few seconds later dangerous thing happens watch shocking viral video on instagram nss
First published on: 22-01-2023 at 10:44 IST