प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिमी चोई हिने शेअर केलेल्या आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टनंतर तिचे चाहते आणि फॉलोअर्स अक्षरशः आवाक झाले आहेत. अर्थात चांगल्या कारणासाठी. कॅनडा येथील मिमी चोई ही तिच्या जबरदस्त आकर्षक आणि अनोख्या ऑप्टिकल इल्यूजन फेस डिझाइनसाठी ओळखली जाते. यावेळीसुद्धा तिने तिच्या याच प्रकारातल्या एका नव्या लूकचा व्हिडिओ शेअर केला. ह्या लूकमध्ये मिमी हिने अनेक डोळे, ओठ आणि कान यांच्या ग्रीडसाठी थेट आपल्याच चेहऱ्याचा कॅनव्हाससारखा वापर केला आहे.

मिमी चोई हिने १६ जुलै रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या उजव्या पापणीवर काढलेल्या ‘ओठांवर’ लिपस्टिक लावली. आपल्या चेहऱ्याच्या केलेल्या या कॅनव्हासवर मिमीने असे अनेक डोळे, कान, ओठ काढले आहेत. इतकंच काय तर अगदी ह्या कानांमध्ये सेफ्टीपिन्स देखील काढले आहेत. अर्थात मिमी हिच्या या भन्नाट व्हिडीओनंतर चाहते तिच्यावर चांगलेच फिदा झाले आहेत. दरम्यान, मिमीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपल्या चाहत्यांना विचारलं आहे की, “तुमच्या मेकअप रूटीनमध्ये तुमची आवडती स्टेप कुठली?”

मिमी चोई हिचे इंस्टाग्रामवर १.५ मिनियन फॉलोअर्स आहेत. आपला हा नवा व्हिडीओ शेअर करताच तिच्या कौशल्याने भारावून जाऊन चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा वर्षाव केला. दरम्यान, मिनी हिच्या या व्हिडीओने आतापर्यंत १.५ मिलियनहुनही अधिक व्ह्यूजची मिळाले आहेत. चाहत्यांच्या भरघोस प्रतिसाद आणि कौतुकानंतर मिमी हिने आणखी एक पोस्ट केली आहे. ह्या पोस्टमध्ये आपण हा लूक तयार करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल माहिती दिली आहे. ह्या पोस्टमध्ये मिमीने लिहिलंय, “हा मेकअप आहे. विश्वास ठेवा. मी माझ्या ब्लॅड कॅप घालून आणि इल्यूजन डिझाईनसह ३ वेळा झोपले. कारण, मला माझ्या डोक्याच्या बाजूचा भाग रंगवताना खूप चक्कर येत होती आणि मळमळ होत होती.”

पुढे सांगताना मिमी म्हणाली, “ह्या लूकसाठी मला साधारणतः ८ तास लागले. माझी किती प्रगती झाली आहे हे पाहण्यासाठी मला माझे २०१५-१६ चे जुने मल्टिपल फिचर इल्युजन्स रिक्रिएट करून पाहायचे होते.”

मिमी चोई हिची आणखी काही अशीच भन्नाट क्रिएशन्स पाहूया :

 

View this post on Instagram

 

A post shared by MIMI CHOI (@mimles)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.