इ-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस गेल्या आठवड्यात आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. या दौऱ्यात त्यांनी भारतातील छोट्या आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल करण्यासाठी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. तसेच, 2025 पर्यंत ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील 10 अब्ज डॉलरच्या वस्तूंची अ‍ॅमेझॉन निर्यात करेल, अशी घोषणाही बेझॉस यांनी केली. त्यानंतर आता कंपनी भारतात Electric delivery rickshaw (इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा) लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी जेफ बेझॉस यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन याबाबत माहिती दिली. यासोबत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला. या व्हिडिओमध्ये बेझॉस स्वतः इ-रिक्षा चालवताना दिसतायेत. या व्हिडिओत त्यांनी, “आम्ही इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा सुरु करत आहोत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असून शून्य कार्बन उत्सर्जन करते” असं म्हणत ट्विटमध्ये त्यांनी ClimatePledge असा हॅशटॅगही वापरला आहे. ही इ-रिक्षा म्हणजे कंपनीने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीकोनातून उचललेलं एक सकारात्मक पाऊल आहे.

या इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर कंपनीकडून भारतात प्रोडक्ट्स डिलिव्हरीसाठी म्हणजेच वस्तू घरोघरी पोहोचवण्यासाठी केला जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon ceo jeff bezos electric delivery rickshaws video sas
First published on: 21-01-2020 at 13:13 IST