‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. रोज किती अपघात होतात, यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू होतो. तर काही जखमी होतात. मात्र कधी कधी म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती…अशाप्रकारे मोठ्या भिषण अघातातूनही काहीजण वाचतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मात्र याला चमत्कार की योगायोग? हे तुम्हीच सांगा.

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

या व्हिडीओमध्ये तरुणाचा अपघात झाला मात्र त्याचं नशिब इतकं बलवत्तर होतं की त्याच्या मागूनच एक अँबुलन्सही येत होती, यावेळी अँबुलन्स ड्रायव्हरनं अपघात झाल्याचं पाहून लगेच अँबुलन्स लगेच त्या तरुणाजवळ नेली. आपल्याला माहितीच आहे एखादा अपघात झाल्यावर अँबुलन्स यायला एवढा वेळ लागतो की कधी कधी अपघातग्रस्ताचा मृत्यूही होतो. मात्र या प्रकरणात चमत्कार झाल्यासारखी लगेच मागून अँबुलन्स आली. हा व्हिडीओ शेअर करताना आतापर्यंतची सर्वात जलद अँबुलन्स असं कॅप्शन दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एमआरआय करायला जाताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा; अन्यथा छोटीशी चूक जिवावर बेतेल, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @NoCapFights या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.