सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आठवेल. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात आजीच्या श्रद्धांजलीनिमित्त ज्या पद्धतीने नृत्य सभा आयोजित करण्यात आली होते. तेच खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर अम्मांच्या श्रद्धांजली सभेचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजच्या पाठच्याबाजून स्वर्गीय आजीचा एक मोठा फोटो आहे. तर अम्माची श्रद्धांजली सभा सुरु आहे आणि डान्सर ‘ले ले मजा ले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्टम्हणजे सगळे या डान्सचा आनंद लूटत आहेत.
आणखी वाचा : दिवसाला १०० सिगारेट आणि ३० कप ब्लॅक कॉफी शाहरुखने केला होता त्याच्या व्यसनाबद्दल खुलासा
आणखी वाचा : करीना कपूरला बॉडी शेम केल्याने पाकिस्तानी अभिनेत्री सोशल मीडियावर झाली ट्रोल
हा व्हिडीओ आतापर्यंत ६५ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकरी म्हणाला की, “हे मी काय पाहतोय. हे असं कोण करतं”. तर दुसर्या नेटकरी म्हणाला, “नक्की आनंद आहेत की दुःखी”. आणखी एक नेटकरी म्हणाला, “मला वाटलं लग्न सुरु आहे”. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.