Amruta Fadnavis: २०२४ या नवीन वर्षाचं मोठ्या दणक्यात आणि उत्साहात स्वागत झाले आहे. सर्वत्र नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.सर्वांनीच नव वर्षाच्या वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा एकमेकांना दिल्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नव वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नेटिझन्सना अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जस्ट लुकिंग लाइक अ वॉव” हा ट्रेंडिंग डायलॉग म्हणत त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर कोणती रिल केव्हा व्हायरल होईल सांगता येत नाही. अगदी कच्चा बदामपासून ते माणिक मांगे हितेपर्यंत रिल्समध्ये अनेक ट्रेंड आले आणि ट्रेंड निर्माण करणाऱ्यांना रातोरात खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या असाच एका महिलेचा नवा डायलॉग खूप ट्रेंड होत आहे. इतकचं नाही तर अनेकांच्या तोंडूनही हा डायलॉग ऐकायला मिळतोय. ज्यावरुन इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स क्रिएट केल्या जात आहेत. ज्यामुळे इन्स्टावर स्क्रोल करताच तो सेम डायलॉग वापरुन केलेल्या रिल्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. हा डायलॉग म्हणजे ‘सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाओ…..’ अगदी सामन्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी त्यावर रिल्स बनवल्या आहेत.यावरच अमृत फडणवीसांनी रिल बनवत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्वप्ननगरी मुंबईमधला नवीन वर्षातील पहिला सूर्योदय; तुम्ही पाहिला का हा सुंदर नजारा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगपासून ते करण जोहर , सान्या मल्होत्रा ​​आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँपर्यंत, प्रत्येकजण तिचा वन-लाइनर डायलॉग वापरुन व्हिडीओ बनवत आहे. नेटकऱ्यांनी अमृता फडणवीसांच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी व्हिडीओचे कौतुक केले आहे.