Viral video: सध्या जगभरात अमेरिकेतील मोठ्या टेक कंपनी Astronomer चे CEO अँडी बायरन यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अलीकडेच कोल्डप्लेच्या एका कॉन्सर्टने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. कारण ठरलं ते बोस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्ट दरम्यान ते त्यांच्या कंपनीच्या HR हेड क्रिस्टिन कॅबोटसोबत रोमान्स करताना किस कॅममध्ये कैद झाले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या अफेयरची जगभरात चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अमूलनं यामध्ये उडी घेत या प्रकरणाचा उपयोग त्यांनी त्यांच्या जाहीरातीसाठी केला आहे.

अमूलच्या जाहिरातींची नेहमीच खूप चर्चा असते. त्यांची जाहिरात मोहिम, ‘अमूल गर्ल’ खूप प्रसिद्ध आहे. ही जाहिरात अनेक वर्षांपासून लोकांना आवडते आणि त्यात विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांवर मजेदार भाष्य केलेले असते. अमूलच्या जाहिरातींमधील विनोद आणि समर्पक टिपण्णी यामुळे त्या नेहमीच लोकांच्या लक्षात राहतात. अशाच यासुद्धा जाहीरातीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय.

अमूलच्या नवीन पोस्टरमध्ये वादग्रस्त जोडप्याचे डूडल आहे, ज्याच्या बाजूला आयकॉनिक अमूल गर्ल आहे. त्यात १९७३ च्या हिंदी चित्रपट बॉबीमधील आयकॉनिक गाण्याचा एक धाडसी संदर्भ देखील होता. “हम तुम एक कॅमेरा में बंध हो!फक्त स्कूप्स, नो अूप्स!” असे जाहिरातीवर लिहिलेले आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान ही जाहिरात अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडली नाही, त्यांनी ब्रँडवर टीका केली आहे.एकानं म्हंटलंय, “अमूल या कोल्डप्ले कपल मीममध्ये सामील होईल अशी अपेक्षा नव्हती,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. “हे तुमच्या मानकांनुसार वाईट आहे, कृपया अशा ट्रेंडिंग विषयांना बळी पडू नका,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहले, “अमूल कधीही ट्रेंड चुकवत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बॉस्टनमधील कोल्डप्ले या बँडच्या कॉन्सर्टदरम्यान सहकारी क्रिस्टीन कॅबोट बरोबरचा बायरन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर कंपनीने त्यांना रजेवर पाठवले होते. आता त्यांनी राजीनामा दिल्याची बाब जाहीर करण्यात आली आहे. अँडी बायरन जुलै २०२३ मध्ये या कंपनीचे सीईओ बनले. याआधी त्यांनी लेसवर्क, सायबरईसन आणि फ्यूज सारख्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. ते सोशल मीडियावर, विशेषतः लिंक्डइनवर कंपनी अपडेट्स आणि उत्पादन बातम्या शेअर करतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात.