सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपल्या अंगावर शहारा आणणारे असतात. शिवाय आजकाल अनेक लोक काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला जीव धोक्यात घालत धोकादायक स्टंट करतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ तुम्ही या आधीही पाहिले असतील. ज्यामध्ये कोणी धावत्या लोकलमधून उडी मारतो तर कोणी चालू बाईकवर उभा राहतो. पण सध्या एका व्यक्तीने असा विचित्र स्टंट केला आहे जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे.
कारण या व्यक्तीने चक्क एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर कार नेण्याचा प्रयत्न केला आहे. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोकांना स्टंटबाजीचे इतके वेड असते की त्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसते. असंच उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. कारचा असा धोकादायक स्टंट कदाचित तुम्ही या आधी पाहिला नसेल.
कार इमारतीवरु थेट खाली पडली –
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक मिळून एक स्टंट करण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे. या स्टंटमध्ये एका कारचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ड्रायव्हर बसला असून ती कार एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक कॅमेऱ्यांच्या मदतीने हा व्हिडिओ शूट करण्यात येत आहे. एका इमारतीच्या वर ही कार उभी असून ड्रायव्हर भरधाव वेगाने कार चालवत ती दुसऱ्या इमारतीवर नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कार दुसऱ्या इमारतीपर्यंत पोहोचू न शकल्याने इमारतीला धडकते आणि थेट खाली पडते.
या स्टंट दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर खाली पडलेली कार पाहण्यासाठी चालकाचे इतर सहकारी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. यावेळी ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असेल असं सर्वांना वाटतं पण सुदैवाने तो किरकोळ जखमी सुरक्षित कारमधून बाहेर आल्याचं दिसताच चालकाचे सहकारी सुटकेचा नि:श्वास सोडतात.