scorecardresearch

Premium

आजीच्या हातची गरमागरम भाकरी खातोय माकड; आजी पुरवतेय नातवंडाप्रमाणे लाड, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड चक्क आजीच्या हातची गरमागरम भाकरी खाताना दिसतोय.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

an old lady feeding bhakari to monkey
आजीच्या हातची गरमागरम भाकरी खातोय माकड; आजी पुरवतेय नातवंडाप्रमाणे लाड (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा कुत्रा, मांजर, गायीचे व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. सोशल मीडियावर माकडाचे सुद्धा व्हिडीओ पाहायला मिळतात. माकड हा जरी जंगली प्राणी असला तरी मानवी वस्तीत त्याचा वावर पाहायला मिळतो. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड चक्क आजीच्या हातची गरमागरम भाकरी खाताना दिसतोय.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजी घराच्या अंगणात चुलीवर भाकरी बनवताना दिसतेय. तिच्या मागे एका उंच भिंतीवर माकड बसलेला दिसत आहे. आजी या गरमा गरम भाकर माकडाला खाऊ घालत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा माकड आजीच्या नातवंडांबरोबर बसलेला दिसत आहे आणि आजी या माकडावर नातवंडाप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आजी आणि माकडाचं हे अनोखं नातं पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

a punekar young man told ukhana for wife and mention the name of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati
Pune Video : “…नाव घेतो श्रीमंत दगडूशेठ की जय” पुणेकर तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
kids dance video
“…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
Woman washes naan before consuming it
काय सांगता? महिलने चक्क नळाखाली धुतले नान अन् मग खाल्ले, व्हायरल व्हिडिओची चर्चा
a man fell with a child in a moving train
बापरे! चालत्या ट्रेनमधून चिमुकल्याला घेऊन खाली पडला, धावत आले लोकं; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : VIDEO : भारत वर्ल्डकप फायनल का हरला? तरुणाने दिले मजेशीर उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

thar_desert_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून खूप छान वाटले, सर्व लोकांमध्ये अशी माणूसकी असायला हवी.” तर एका युजरने लिहिलेय, “भूतदया हा माणसाचा पहिला धर्म आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “गावातील जीवन”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An old lady feeding bhakari to monkey grand mother pampering monkey like grandchild video goes viral ndj

First published on: 24-11-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×