scorecardresearch

Premium

व्यक्तीने मस्करीच्या नादात फोनवर बोलणाऱ्या महिलेच्या स्कर्टला लावली आग… Video पाहून व्हाल चकित!

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत अज्ञात व्यक्ती दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका महिलेच्या स्कर्टला मस्करीत आग लावते आणि महिलेला याची जाणीवसुद्धा होत नाही.

An unknown person sets fire to the skirt of a woman standing outside a shop
(सौजन्य:ट्विटर/@Intrusivetgw)व्यक्तीने मस्करीच्या नादात फोनवर बोलणाऱ्या महिलेच्या स्कर्टला लावली आग… Video पाहून व्हाल चकित!

Viral Video : मित्र-मैत्रिणींसोबत अनेकदा मस्करी केली जाते. पण, काही जण असे असतात; जे मस्करी करताना मर्यादा ओलांडतात आणि ती मस्करी कधीतरी माणसाच्या जीवावर बेतू शकते किंवा त्याला एखादी इजा होऊ शकते. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात अज्ञात व्यक्ती दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका महिलेच्या स्कर्टला मस्करीत आग लावते आणि महिलेला याची जाणीवसुद्धा होत नाही.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला दुकानाबाहेर फोनवर बोलत असते आणि एक अज्ञात व्यक्ती तिच्यामागे खुर्चीवर बसलेली असते. अचानक अज्ञात व्यक्तीच्या मनात काय येतं ठाऊक नाही; पण ती महिलेच्या स्कर्टला लायटरने आग लावते आणि स्कर्ट हळूहळू जळू लागतो. पण, तरीही त्या महिलेचं लक्ष स्कर्टकडे जात नाही. दुकानाबाहेर उभी असलेली ती महिला जेव्हा चालत पुढे जाते तेव्हा तिला शरीर जळत असल्याची जाणीव होते आणि ती मागे स्कर्टकडे बघते तेव्हा तिला स्कर्ट जळताना दिसतो. अज्ञात व्यक्तीने कशा प्रकारे महिलेसोबत मस्करी केली ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

Turn any YouTube video convert into a GIF Just using Three Tools Know The Step By Step
तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचे करा GIF मध्ये रूपांतर; फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?
Sachin Dhas successful performance in U19 World Cup cricket tournament in South Africa sport news
वडिलांचा विश्वास सार्थकी लावताना बीडच्या सचिनची यशस्वी कामगिरी!
a husband dance with wife sitting on wheelchair emotional video goes viral
“नवरा असावा तर असा!” व्हीलचेअरवर बसलेल्या पत्नी बरोबर केला सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा… व्हीलचेअरवर बसलेल्या आईला हातात उचलून विमानात बसवताना दिसला तरुण, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोकांचे अश्रू झाले अनावर

व्हिडीओ नक्की बघा :

मस्करी पडली असती महागात :

महिलेला जेव्हा समजते की, तिच्या स्कर्टला आग लागली आहे तेव्हा ती दुकानात धावत जाते आणि आग विझवण्याचा प्रयत्न करते. तसेच नंतर दुकानातील एका व्यक्तीची मदतसुद्धा घेते. आगीची तीव्रता अगदीच कमी असल्यामुळे दुकानातील व्यक्ती आणि ती महिला मिळून आग विझवण्यात यशस्वी होतात. परिणामी त्या महिलेला कोणतीही इजा होत नाही. मात्र, अज्ञात व्यक्तीद्वारे अशा प्रकारची मस्करी करणं महिलेच्या जीवावर बेतू शकलं असतं; पण वेळीच आग विझवल्यामुळे त्या महिलेवर कोणतंही संकट ओढवलं नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Intrusivetgw या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला स्कर्टला आग लागलेली पाहून घाबरते आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करते; पण त्यावेळी स्कर्टला आग लावणारी अज्ञात व्यक्ती एका ठिकाणी गप्प बसून असते. अज्ञात व्यक्ती महिलेची माफी मागत नाही किंवा आपली चूक मान्यसुद्धा करीत नाही. पण, वेळीच खबरदारी घेतल्यामुळे महिलेला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An unknown person sets fire to the skirt of a woman standing outside a shop asp

First published on: 01-10-2023 at 12:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×