Anaconda Viral Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. सध्या अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात. तुम्ही अॅनाकोंडा नेहमी सिनेमात पाहिला असेल. अॅनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो. एनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काही वेगळं सांगायला नको. सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो. इतर साप पक्षांची अंडी, उंदीर, बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाची वगैरे शिकार करतात. पण एनाकोंडा पार वाघ सिंहांना सुद्धा जिवंत गिळण्याची क्षमता ठेवतो.
अशाच एका भल्यामोठ्या एनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अॅनाकोंडानं चक्क मगरीची शिकार केलीय. तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. यरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये एक अजगर आणि मगर असल्याचे दिसून येते. यावेळी अजगराने मगरीवर पूर्ण ताबा मिळवला असून मगरीने आपले संपूर्ण नियंत्रण हरवल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की दोघेही अचानक पाण्याजवळ समोरासमोर येतात. सुरुवातीला वातावरण शांत असते, पण काही सेकंदातच अजगर लगेच हल्ला करतो. महाकाय अजगर मगरीला आपल्या मुठीत धरतो आणि नंतर त्याची मान घट्ट धरतो.
अॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे, जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरुन मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा कोणताही मोठा प्राणी सहज गिळू शकतो. हा साप शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करुन त्याची श्वास घेण्याची शक्तीच संपवतो. त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकतो. ॲनाकोंडाच्या चार जाती आहेत. त्यात ग्रीन ॲनाकोंडा हा सर्वात मोठा आहे. तो आपले संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो. त्यांच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. जेणेकरून ते पाण्याखाली असतानाही शिकार पाहू शकेल.
पाहा व्हिडीओ
कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा साप अॅमेझॉनच्या जंगलात आढळला. पण व्हिडीओवरुन हा AI जनरेटेड व्हिडीओ आहे असं दिसतेय. म्हणजे, हा व्हिडीओ खरा नाही. एआय सॉफ्टवेअर्सच्या मदतीनं या सापाची निर्मिती करण्यात आली आहे. अॅनाकोंडा हे प्रामुख्यानं अॅमेझॉनच्या जंगलात सापडतात, कारण तिथलं वातावरण हे एनाकोंडासाठी पोषक आहे.