आपल्या विशिष्ट डिझाईन, मायलेज आणि बोल्डनेसमुळे स्कॉर्पिओने अनेक वर्षे ग्राहकांच्या मनात राज्य केले आहे. हा वरसा आता नव्या स्कॉर्पिओ एनच्या माध्यमातून पुढे चालणार आहे. ग्राहकांना नवी स्कॉर्पिओ पसंत पडली असून, केवळ ग्राहकच नव्हे तर महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील स्कॉर्पिओ वन खरेदी केली आहे. डिलिव्हरीच्या दिवशी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या स्कॉर्पिओसाठी नाव सूचवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांना त्यांच्या स्कॉर्पिओसाठी दमदार नाव मिळाले आहे.

आनंद महिंद्र यांनी ट्विटरद्वारे आपल्या स्कॉर्पिओ एनला दिलेले नाव जाहीर केले, तसेच त्यांनी नाव सूचवणाऱ्या लोकांचे आभार देखील मानले. आनंद महिंद्रा यांनी आपल्या नव्या स्कॉर्पिओ एनला भीम हे नाव दिले आहे. आपल्या वाहनासाठी नाव सूचवायला सांगितल्यानंतर त्यासाठी हजारांवर नाव सूचवण्यात आले होते. मात्र यातील केवळ दोन नाव निवडण्यात आले. यातील एक नाव ‘भीम’ होते आणि दुसरे होते ‘बिच्छू’. शेवटी पोलच्या माध्यमातून नाव ठरवण्यात आले. वाहनाला भीम हे नाव देण्यात आले.

(Viral : तरुणीने रोलरकोस्टरवर घेतले ‘नो इमोशन चॅलेंज’, प्रत्येक झटक्यावर पोट धरून हसवले, पाहा व्हिडिओ..)

शॉर्टलिस्ट केलेल्या दोन्ही नावांसाठी घेण्यात आलेल्या पोलबाबत देखील आनंद महिंद्रा यांनी माहिती दिली. महिंद्रा यांनी नाव सूचवणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले. भीम नावासाठी ७७.१ टक्के लोकांनी मत दिले असून, बिच्छू या नावासाठी केवळ २२.९ टक्के लोकांनी मत दिले आहे.

इतकी आहे किंमत

महिंद्रा स्कॉर्पिओ एनला बाजारात प्रचंड मागणी आहे. स्कॉर्पिओ-एनने पहिल्याच दिवशी बुकिंगच्या बाबतीत विक्रम केला होता. अवघ्या एका मिनिटात २५ हजार स्कॉर्पिओ-एन चे बुकिंग झाले होते. महिंद्रा स्कॉर्पिओ एनची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३.९० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

(अबब.. १६ महिन्यांचं बाळ चक्क निष्णात जलतरणपटू सारखं पोहतय, चपळता आणि वेग पाहून कराल कौतुक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिंद्राने आपल्या नवीन स्कॉर्पिओमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स जोडले आहेत. पण ज्या वैशिष्ट्याची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे सनरूफ. प्रथमच, महिंद्राने स्कॉर्पिओमध्ये सनरूफ फीचर जोडले आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-एनला ‘बिग डैडी ऑफ एसयूवी’ म्हणून प्रमोट करत आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना जुन्यापेक्षा वेगळी आहे. कंपनीने याला आधुनिक डिझाइन दिले असून त्याचा आकारही जुन्या स्कॉर्पिओपेक्षा मोठा आहे.