सोशल मीडियावर उद्योगपती आनंद महिंद्रा सक्रिय असतात. आनंद महिंद्रा यांचे प्रत्येक ट्वीट हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. आनंद महिंद्रा क्रिएटीव्ह लोकांची स्तुती तर करतातच पण त्यांना अनेकदा मदतीचा हातही देतात. आता आनंद महिंद्रा यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा आपल्या खेळण्यातील ट्रॅक्टरने चिखलात अडकलेल्या जेसीबीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, परंतु तुमच्यापैकी कोणी आमच्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या खेळण्यांसह प्रयत्न करत असल्यास कृपया लक्षात ठेवा की हे पालकांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक करा.”

सोशल मीडियावर या व्हिडिओला सुमारे तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला २३ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने सांगितले की, मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान खूपच गोंडस दिसत आहे. हा व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असल्याचे आणखी एका युजरचे म्हणणे आहे.