सध्या मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलं देखील मोबाईल फोनच्या आहारी जाऊ लागली आहेत. अगदी लहान वयात त्यांच्या हातात मोबाईल, टीव्ही सारखे आधुनिक उपकरण आल्याने याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतात. अनेक घरातील लहान मुलं मोबाईल फोन पाहिल्याशिवाय नीट जेवत देखील नाहीत आणि त्यामुळे पालकांची चिंता देखील वाढू लागली आहे.

लहान मुलांच्या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही यासंबंधीचा एक रिसर्च शेअर केला आहे, ज्यामध्ये आपण मुलांना वेळेआधी स्मार्टफोन का देऊ नये हे स्पष्ट केले आहे. तसेच मुलांना स्मार्टफोन देणाऱ्या पालकांना आनंद महिंद्रांनी इशारा दिला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की स्मार्टफोनला तासनतास चिकटून राहिल्याने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

पाहा पोस्ट

हेही वाचा – How Traffic Camera Works: ट्रॅफिक कॅमेरा नेमकं कसं करतो काम? कशी असते तुमच्यावर करडी नजर, जाणून घ्या

आनंद महिंद्रा यांनी Sapien Labs आणि Krea Universiry, AP यांनी केलेले संशोधन ट्विटरवर शेअर केले. यावेळी त्यांनी लहान मुलांच्या पालकांना मोबाईलमुळे लहान मुलांवर काय परिणाम होतो हे सांगितले आहे, तसेच त्यांना हा अभ्यास वाचण्याचा सल्ला दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी हा रिसर्च शेअर करताना हे अतिशय त्रासदायक असल्याचं म्हंटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्लोबल माइंड प्रोजेक्टद्वारे सादर केलेल्या या रिसर्चमध्ये स्मार्टफोनच्या संपर्कात असल्‍याने लहान मूल प्रौढावस्थेत प्रगती करत असताना त्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे सांगितले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात १८ ते २४ वयोगटातील २७ हजार ९६९ लोकांचा समावेश आहे.