scorecardresearch

‘संकट जितकं मोठं दिसतं तेवढं…’; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला मोलाचा संदेश देणारा Video पाहिलात का?

संकटाच्या काळात कसे वागावे? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

‘संकट जितकं मोठं दिसतं तेवढं…’; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला मोलाचा संदेश देणारा Video पाहिलात का?
आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

संकटं कधी सांगून येत नाहीत, ती जेव्हा येतात तेव्हा आपल्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याच्या भीतीनेच माणूस खचून जातो. पण अशावेळी संयम बाळगण्याची विवेकबुद्धीने विचार करण्याची गरज असते. पण आपल्या मनातील विचारच आपल्यावर इतके प्रभावी होतात, की भीतीमुळे पर्याय शोधणेच आपण सोडून देतो. अशीच काहीशी परिस्थिती दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला एक विमान घरं असणाऱ्या, वस्ती असणाऱ्या ठिकाणी लँडिंग करत असलेले दिसत आहे. हे पाहून कोणीही घाबरेल, कदाचित विमानावरील नियंत्रण सुटल्यामुळे हे विमान असे खाली येत आहे असे वाटू शकते. पण नंतर कळते की ही एक लहान खेळण्यातील विमान असून मुलं त्याबरोबर खेळत आहेत. पाहा व्हिडीओ.

आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

हा व्हायरल व्हिडीओ पाहून सुरूवातीला आनंद महिंद्रा देखील घाबरले असल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे. याबरोबर ‘संकटावरील उपाय या नेहमी तुमच्याचजवळ उपलब्ध असतो. पण मनातील भीती त्या संकटाला एवढ मोठं करते की त्यापुढे काहीही सुचत नाही. संकट किंवा एखादी समस्या आहे त्यापेक्षा भीतीमुळे जास्त मोठी होते’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 17:25 IST

संबंधित बातम्या