काखेत कळसा आणि गावाला वळसा… ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एखादी गोष्ट हरवली असेल तर आपण प्रत्येक ठिकाणी शोधतो. पण, स्वतःच्या घरात शोधत नाही व ही हरवलेली गोष्ट कधीकधी घरातच मिळून जाते. तर याचे उत्तम उदाहरण आज प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच जुगाड व्हिडीओ म्हणा किंवा अनेक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करीत असतात. पण, आज त्यांनी वैयक्तिक जीवनातील एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगत युजर्सना एक संदेश दिला आहे.अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती व्याख्यानात आनंद महिंद्रा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी आनंद महिंद्रानी आपल्या धाकट्या लेकीच्या हाताला दुखापत झाली होती हे सांगत तिच्या उपचारासाठी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. त्या क्षणाची आठवण त्यांनी युजर्सबरोबर शेअर केली आहे व प्रत्येक गोष्टीवर कसा उपाय शोधला जाऊ शकतो, हे सांगितले आहे.

हेही वाचा…पुस्तके वाचण्याचा छंद अन् आयएएस होण्याचे स्वप्न; पाहा १२ वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयस्पर्शी VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

काच लागल्यामुळे त्यांच्या लेकीच्या हाताला दुखापत झाली त्यामुळे तिची मायक्रोसर्जरी करायची होती. आनंद महिंद्रा यांच्या लेकीला पॅरिस आणि लंडनमधील प्रसिद्ध शल्यचिकित्सक उपचार घेऊनही, मुंबईतील डॉक्टर जोशी यांच्या उपचाराचा लेकीला गुण आला. आनंद महिंद्रा म्हणाले, डॉक्टर जोशी यांनी लेकीच्या बोटात एक साधा धातूचा आय हूक (Eye Hook) टाकला ; या उपकरणाची किंमत फक्त दोन रुपये होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी डॉक्टर जोशींनी आय हूकचा वापर करून लेकीच्या बोटाची हालचाल करण्यास कशी मदत झाली हे व्हिडीओत स्पष्ट केले व काही काळानंतर त्यांची लेक त्याच हाताने पियानो वाजवू लागली.

आनंद महिंद्रा म्हणाले, ही कथा पुन्हा सांगण्याचे कारण की, या प्रसंगाने मला एक धडा शिकवला. सगळीकडे उपाय शोधण्यापूर्वी तुमच्या घराच्या अंगणात उपाय शोधा असे आनंद महिंद्रा म्हणत आहेत. म्हणजेच लेकीच्या उपचारासाठी परदेशात सगळ्यात उत्तम पर्याय असूनदेखील, मुंबईतील जोशी डॉक्टरांच्या युक्तीचा आनंद महिंद्राच्या लेकीच्या उपचारासाठी फायदा झाला ; असे आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओत म्हटले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या @hvgoenka या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘माझ्या मित्राने सांगितलेली एक सुंदर कथा’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.