सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा उद्योगपतीबरोबरच सोशल मीडिया ॲप एक्सचे (ट्विटर)ॲक्टिव्ह युजर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कारण- विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींची माहिती ते ट्वीटच्या माध्यमातून देताना दिसतात. आज त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये वरच्या बाजूला एक खास डबा असलेली एक अनोखी आणि नावीन्यपूर्ण कार दाखवली आहे. व्हीलचेअर वापरणार्या व्यक्तींसाठी हे खास वाहन तयार करण्यातआले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक अनोखी गाडी तयार करण्यात आली आहे. या गाडीवर एक खास वर्तुळाकार डबा बनवण्यात आला आहे. हा डब्बा गोल फिरून गाडीच्या दरवाजापाशी येतो आणि त्यातून एका साधनाच्या साह्याने व्हीलचेअर बाहेर येते. नंतर व्हीलचेअर खाली उतरवणारे साधन वर जाते. नंतर एक महिला गाडीतून अगदी सहज त्या व्हीलचेअरवर जाऊन बसते आणि गाडीचा दरवाजा बंद करून व्हीलचेअर घेऊन निघून जाते. अनोख्या गाडीचा हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा…
पोस्ट नक्की बघा :
आनंद महिंद्रा यांची पोस्ट :
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, सुपर स्मार्ट आणि उपयोगी डिझाईन. मला अभिमान वाटला असता, जर आमची वाहनंसुद्धा अशी फिटमेंट (fitments) देऊ शकली असती. मोठ्या प्रमाणावर उत्पादनात गुंतलेल्या ऑटो ओएमसाठी (Auto OEM) हे करणं खूप कठीण आहे. पण, अशा स्टार्टअपमध्ये मी स्वइच्छेनं गुंतवणूक करीन, असे त्यांनी म्हटले आहे.
दिव्यांग व्यक्तींचे आयुष्य आपल्या जीवनापेक्षा खूप वेगळे असते. त्यांना अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या गोष्टीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि त्यांच्या सोईसाठी अशी खास गाडी बनवण्याची इच्छा आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमधून व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @anandmahindra या आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.