महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही उत्तम फोटो पोस्ट करतात आणि नेटकऱ्यांना त्या फोटोला योग्य कॅप्शन द्यायला सांगतात. अनेक दिवसांनंतर त्यांनी एक फोटो शेअर करत त्यासाठी कॅप्शन मागितलं होतं. शिवाय चांगले कॅप्शन देणाऱ्यासाठी त्यांनी बक्षीस देखील जाहीर केलं होतं. आता त्यांनी चांगलं कॅप्शन देणाऱ्या विजेत्याचे नाव जाहीर केले असून त्याला बक्षिस म्हणून एक ट्रक देखील दिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये तोंडात कॅमेरा धरलेली एक सिंहीण दिसत आहे. हा फोटो २०१८ मध्ये बोत्सवाना येथील वन्यजीव छायाचित्रकार बार्बरा जेन्सन वूस्टर यांनी काढला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी ट्विटर युजर्सना यासाठी योग्य असे कॅप्शन देण्यास सांगितले होते. शिवाय यासाठी त्यांनी ९ मे पर्यंत वेळ दिला होता. यासोबतच त्यांनी सर्वोत्तम कॅप्शन लिहिणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून ट्रक देण्याचे आश्वासन दिले होते.

खूप दिवसांनी कॅप्शन स्पर्धा-

हेही पाहा- लग्नाच्या स्टेजवर भन्नाट डान्स करणाऱ्या इंजिनीअर मामाचा जागीच मृत्यी, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

हा फोटो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “मी मागील अनेक दिवसांपासून कॅप्शन देण्यासाठी पोस्ट टाकली नसल्याची मला आठवण करुन देण्यात आली आहे. तुमच्या टाईम पाससाठी इथे काहीतरी आहे! मला डावीकडील सिंहिणीच्या फोटोसाठी कॅप्शन पाठवा आणि सर्वात चांगले कॅप्शन लिहीणाऱ्याला भेट म्हणून महिंद्रा अॅंड महिंद्राचा Furio मॉडेल टॉय ट्रक मिळेल.”

हेही पाहा- “लग्नासाठी सरकारी नवरा…” बेरोजगार तरुणाने मुलींच्या पालकांना पोस्टरद्वारे केलं अनोखं आवाहन, स्टेडियमधील ‘तो’ Video व्हायरल

‘या’ व्यक्तीला मिळाला ‘ट्रक’ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा यांच्या इतर ट्विटप्रमाणेच सिंहीणीने कॅमेरा तोंडात धरल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि यूजर्सनी आपापल्या पद्धतीने कॅप्शन पाठवण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी पाठवलेल्या कॅप्शनमधून महिंद्रा यांनी एक उत्तम कॅप्शन निवडले असून त्यानी ते लिहिणाऱ्याचे नाव घोषीत केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘माझ्या कॅप्शन स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करत आहे, स्केल मॉडेल फ्युरियो ट्रक मिळाल्याबद्दल @nimishdubey तुमचे अभिनंदन.’ या फोटोच्या कॅप्शनमध्ये निमिष दुबेने लिहिलं होतं, “Say cheese. Or I will say ‘lunch” जे आनंद महिंद्रा यांना खूप आवडलं.