Shocking vido: रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. मात्र प्रत्येक वेळी यामध्ये फक्त प्राण्यांची चूक नसते तर माणसंही त्यांना मुद्दाम त्रास देतात. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बैलाशी मस्ती करताना दिसत आहे. बैलाला चिडवण्याची चूक हा व्यक्ती करतो आणि चांगलाच तोंडावर आपटतो. बैलाची विनाकारण खोड काढणं चांगलंच अंगलट आलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ @crazyclipsonly नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बैलाला डिवचताना दिसत आहे. हा व्यक्ती बैलाला चिडवण्याची चूक करतो, त्यानंतर प्राणी चिडतो आणि त्याला शिंगावर घेऊन फेकतो. व्हिडिओला आतापर्यंत ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ सिंहाच्या कळपानं हत्तीच्या जुळ्या पिल्लांवर केला हल्ला; हृदयद्रावक VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘प्राण्याला विनाकारण त्रास देण्याची चूक करू नका.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप धोकादायक व्हिडिओ.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘ती व्यक्ती कोणत्या अवस्थेत असेल याचा विचार करूनही मला भीती वाटते.’

Story img Loader