Shocking vido: रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. मात्र प्रत्येक वेळी यामध्ये फक्त प्राण्यांची चूक नसते तर माणसंही त्यांना मुद्दाम त्रास देतात. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका तरुणाला वळूची खोड काढणं चांगलंच अंगलट आलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वळूसोबत घेतला पंगा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वळूला हा तरुण मुद्दाम त्रास देत आहे. त्याला हात लावतोय, त्याच्या शिंगाना पकडण्याचा प्रयत्न करतोय. बराच वेळ तरुणाचं त्रास देणं सुरु असतानाच वळूला राग अनावर होतो आणि तो तरुणाला थेट शिंगावर उचलून रस्त्यावर फेकून देतो. तरुणाला अशी अद्दल घडते की तरुण पोट धरुन तिथून पळ काढतो. आजूबाजूचेही लोक बघत राहतात. सहसा प्राणी माणसांच्या वाटेला जात नाहीत, मात्र त्यांना त्रास दिला तर ते सोडतही नाहीत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटचा पाऊस पहायला मिळतोय. असे प्राणी कधी धोकादायक होतील, त्यांना कधी येईल आणि हल्ला करतील याचा काही नेम नसतो. सध्या हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. दरम्यान, यापूर्वीही प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झालेले पहायला मिळाले. त्यामुळे रस्त्यावरील किंवा पाळीव प्राण्यांपासूनही सावध राहण्याची गरज आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> VIDEO: बापरे! तरुणानं चक्क मगरीला घेतलं खांद्यावर; पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क

हा व्हिडीओ sonyboy1931 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ हजारो लाईक्स, व्ह्युज मिळत असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.