सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला थक्क करणारे असतात, तर काही पोट धरुन हसायला लावणारे. सध्या असाच एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला एका पुरुषाला उचलून आपटते आणि नंतर त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेने ज्या पुरुषाला मारहाण केली आहे, तो तिचा नवरा असल्याचे सांगितलं जात आहे.
स्टेशनवरील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल –
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला स्टेशनवर उभी असल्याचे दिसत आहे. तेव्हा तिचा एक पुरुष तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. यावेळी दोघांमध्ये वाद होतो आणि महिला अचानक ती त्याला ठोसा मारते आणि नंतर त्याला उचलून प्लॅटफॉर्मवरच आपटते आणि मारहाण करायला सुरुवात करते. तर यावेळी तो पुरुषदेखील महिलेचे केस ओढायला सुरुवात करतो.
हेही पाहा- “तुझ्या बापाची मेट्रो आहे का?” मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
व्हिडीओ पाहून लोकांना आठवलं WWE –
व्हिडीओत, स्टेशनवर असणारे इतर प्रवासी नवरा-बायकोची हाणामारी पाहत उभे आहेत. यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट करतो, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, हे लोक इथे काय करत आहेत, त्यांनी WWE मध्ये जायला पाहिजे. विवेक सिंह नावाच्या युजरने लिहिलं आहे, ‘हे वेगळं काही नाही तर प्रेमाची दुसरी बाजू आहे.’ तर आणखी एका युजरने लिहिलं, ‘ही महिला WWE च्या चॅम्पियनसारखी दिसते.’ तर तिसऱ्याने, “मी खात्री देतो की यांची मुलां WWE पाहत असतील, त्यामुळेच त्यांना अशी लढाई करण्याची कल्पना सुचली आहे.” अशी कमेंट केली आहे.