Tiger Attack Crane Viral Video : तुम्ही आ बैल मुझे मार ही म्हण ऐकली असेल, ज्याचा अर्थ स्वत:हून एखाद्या संकटाला आमंत्रण देणे असा होतो. अनेकदा माणूस रोजचं आयुष्य जगत असताना स्वत:हून विविध संकटांना आमंत्रण देतो. म्हणजे तुमच्या एखाद्या कृतीतून, वागण्यातून स्वत:वर नवीन संकट ओढावून घेतात. पण, माणूसचं नाही तर प्राणीदेखील कित्येकदा असं करताना दिसतात. याचचं जिवंत उदाहरण तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल, ज्यात एक पक्षी स्वत:हून वाघाच्या कळपासमोर जातो. नुसतं त्यांच्याजवळ जात नाही तर त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतो. यानंतर वाघ संधी साधत असं काही करतात की पाहून तुम्हाला धडकी भरेल. हा व्हिडीओ पोहून लोक म्हणत आहेत की, म्हणून विनाकारण कोणासमोरही आपल्या शक्तीचे प्रदर्शन करू नये.

वाघ हा इतका धोकादायक शिकारी आहे की तो संधी मिळताच कितीही मोठा प्राणी असो त्याला फाडू शकतो. तो आपल्या शिकारीवर इतक्या वेगाने हल्ला करतो की, त्याला काही विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही. आता या व्हिडीओत पाहा ना, एक बगळा सात वाघांच्या कळपाजवळ पोहोचतो. यानंतर या वाघांना आपली हुशारी आणि ताकद दाखवू लागतो. इकडून तिकडे उड्या मारत तो वाघांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतो. जर हा पक्षी हुशार असता तर संधी पाहून तो उडून गेला असता, पण त्याने मूर्खपणा करत स्वत:च मृत्यूला आमंत्रण दिले.

वाघाच्या कळपाचा बगळ्यावर जीवघेणा हल्ला (Tiger Attack Crane Video)

व्हिडीओत पाहू शकता, सात वाघांच्या एका कळपाजवळ बगळा चालत जात असल्याचे दिसतेय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो वाघांकडे पाहतोय, पण तिथून उडून जात नाही. हळूहळू तो वाघांच्या अगदी जवळ जातो आणि पंख पसरवून शक्तिप्रदर्शन करू लागतो. तो पुन्हा पुन्हा वाघांकडे जातो आणि पंख पसरवत चोचीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला उडून जात आपला जीव वाचवण्याची संधी असते. पण, तो स्वत:हूनच अशाप्रकारे मृत्यूला आमंत्रण देतो. पक्ष्याचा हा खेळ सुरू असतानाच वाघ संधी शोधतात आणि क्षणात पक्ष्यावर जोरदार हल्ला करतात. एका पक्ष्याला मारण्यासाठी संपूर्ण वाघांचा कळप धावत येतो. यात पक्ष्याचा क्षणात मृत्यू होतो.

वाघाच्या कळपाने पक्ष्याचा केलेल्या शिकारीचा हा व्हिडीओ X वर Rainmaker1973 नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना २४ मे २०२५ रोजी चीनच्या देझोऊ शहरात घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर मजेदार कमेंट करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले की, म्हणूनच असे म्हटले जाते की सगळीकडे आपली ताकद दाखवणे योग्य नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, हा पक्षी खरोखरच एक मोठा मूर्ख आहे. तिसऱ्याने लिहिले की, तो बिचारा धाडस दाखवण्याचा प्रयत्न करताना मरण पावला!