आजकाल लोक रील बनवण्यासाठी आणि लाईक मिळवण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. शिवाय इंटरनेटवर झटपट फेमस होण्यासाठी काहीजण खूप विचित्र स्टंट करत असतात, ज्यामध्ये काही लोक रेल्वे रुळांवर, तर काही बाईकवर जीवघेणे स्टंट करत असतात. सध्या असाच एक विचित्र स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क पेट्रोल पंपावर पेट्रोलने बाईक धुताना दिसत आहे. पण त्याला असा विचित्र स्टंट करणं महागात पडणार आहे, कारण आता या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं आहे.

चक्क पेट्रोलने धुतली बाईक –

व्हायरल व्हिडिओमध्ये, पेट्रोल पंपावर एक तरुण स्वत: आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे. जेव्हा बाईकची टाकी भरते तेव्हा टाकीमधून पेट्रोल बाहेर यायला सुरुवात होते. तरीही हा तरुण पेट्रोल भरणं थांबवत नाही, शेवटी तो बाईकवर उरलेलं पेट्रोल ओतताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर पोलिसही सक्रीय झाले आहेत.

पोलीस कारवाई करणार?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी अमरोहा पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण पेट्रोल पंपावरच चक्क पेट्रोलने बाईक धुतल्याचा हा व्हिडीओ कदाचित पहिलाच असावा. शिवाय हा विचित्र व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित नावाच्या नेटकऱ्याने लिहिलं की, “रीलसाठी काहीही मूर्खपणा, स्वत:ही मरेल आणि इतरांना मारेल.” @AnadiMisra1 ने लिहिलं “रीलसाठी बेरोजगार तरुण किती वेडे आहेत?” तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओतील तरुणासह पेट्रोल पंपाच्या मालकावरही कारवाई करायला हवी असं म्हटलं आहे.