Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही रिल्स एवढ्या व्हायरल होतात की लोक त्यावर अनेक मजेशीर व्हिडीओ बनवताना दिसतात. तुम्ही सध्या व्हायरल होत असलेले आप्पाचा विषय हार्ड आहे, हे गाणं ऐकले असेल. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने आप्पाचा विषय का आहे, याविषयी सांगितले आहे. (Appacha Vishay Lay Hard Hai young guys told reason behind)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण दिसेल. हे तरुण आप्पाचा विषय का हार्ड आहे, याविषयी सांगतात.
एक तरुण म्हणतो, “आप्पाचा विषय लय हार्ड आहे” तर दुसरा तरुण म्हणतो, “आप्पाकडे दोन चार क्रेडिट कार्ड आहे” पहिला तरुण पुन्हा म्हणतो, “पण आप्पाच्या नावावर मोकार लोन आहे आणि आप्पा इएमआय भरुन जाम आहे” त्यावर दुसरा तरुण म्हणतो, “आप्पाचा विषय लय हार्ड आहे” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Independence Day 2024: स्वातंत्रदिनी पंतप्रधान मोदींनी बांधलेल्या फेट्याचे राजस्थानशी आहे खास कनेक्शन? जाणून घ्या त्याची खासियत

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video )

jhingat_sunnya या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आप्पाचा विषय लय हार्ड आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आप्पाचा विषय लय हार्ड आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच हार्ड विषय आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अगदी खरंय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : ‘छडी लागे छम छम…’माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा; मुख्याध्यापकाने सत्कार नव्हे, ‘असं’ केलं स्वागत की… ; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस

व्हायरल गाणं ( Viral Song – Appacha Vishay Lay Hard Hai)

“आप्पाचा विषय लय हार्ड हे.
आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड हे
आप्पाचं घरात नाय ध्यान पण
आप्पाचा बाहेर लय लाड आहे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे गाणं कुणी लिहिले आणि कुणी गायले? युट्युबवर वरदान या नावाने अकाउंट असलेल्या एका तरुणाने हे गाणं गायलं आहे आणि त्यानेच हे गाणं लिहिले सुद्धा आहे.