वृक्ष संवर्धन या विषयावरून राज्यात वादळ उठलं असताना लेखक अरविंद जगताप यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अवघ्या २२ सेकंदाचा हा व्हिडीओ डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण असं या व्हिडीओ मध्ये नेमकं आहे काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

अरविंद जगताप यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये एक तरुण शेतात झाड लावताना दिसत आहे. हा तरुण हाताने अधू असूनही आपल्याला शक्य होईल अशा पद्धतीने या झाडाच्या अवती भोवती माती लावताना पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ शेअर करत जगताप यांनी “काळजाला हात घातला या मित्राने” असं कॅप्शन देत या तरुणाच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. तसेच वटवृक्षासारखा मोठा हो असे म्हणत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

अरविंद जगताप यांनी शेअर केला हा Video

दरम्यान या व्हिडीओ वर अनेकांनी कमेंट करून या तरुणाला शाबासकी दिली आहे. धडधाकट मंडळी झाडांच्या जीवावर उठलीत आणि तुझ्यासारखी माणसं जीवापलीकडे झाडांना जपत आहेत अशा शब्दात काहींनी सध्याच्या आरे वादावरही टिप्पणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अरविंद जगताप हे अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचं काम करत आहेत. २०१९ मध्ये त्यांना शेतकरीवाद प्रसारक मंडळ (SPM) यांच्यातर्फे पहिला राष्ट्रीय झाड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. अरविंद जगताप यांनी यापूर्वी आपल्या वडिलांच्या वाढदिवशी ७५ देशी वृक्षांची लागवड करूनही एक वेगळा पायंडा घातला होता.