छंद ही एक अशी गोष्ट आहे. ज्यातून व्यक्ती इतरांना शक्य होणार नाही अशी गोष्टही सहजपणे करुन दाखवू शकतो. या छंदामुळेच अनेकांना स्वत:ची एक वेगळी ओळख मिळते. अशाप्रकारे आसामच्या जोरहाटमध्ये राहणाऱ्या हेमप्रभा नावाच्या ६२ वर्षीय आजींनी लहानपणी हातमागावर कपडे विणकाम करून कापड बनवणे शिकले. पण कालांतराने हे विणकाम त्यांचा छंद बनला. पण हाच छंद जोपसत त्यांनी अशी एक गोष्ट घडवली आहे ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. या आजींनी हातमागाच्या साहाय्याने रेशमी कापडावर भगवद्गीतेचे श्लोक विणकाम करत तयार केले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कापडावर विणकामातून तयार केले भगवद्गीचे श्लोक

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या आजी हातमागाच्या साहाय्याने कापडावर विणकाम करताना दिसत आहेत. अशाचप्रकारे विणकाम करत त्यांनी रेशमी कापडावर संस्कृत, इंग्रजी आणि आसामी भाषांमध्ये भगवद्गीतेचे श्लोक तयार केले आहेत. हेमप्रभा आजींनी विणकामातून तयार केलेल्या या गोष्टीचा यापूर्वी कोणी विचारही केला नसेल.

त्यांनी २ वर्षात २५० फूट लांब कापडावर संस्कृतमध्ये भगवद्गीता तयार केली. यानंतर त्यांनी कापडावर आसामी आणि इंग्रजी भाषेत भगवद्गीतेचे श्लोकही विणले. मात्र इंग्रजीतील श्लोक त्यांना वाचता येत नाही. इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील जवळपास ७०० श्लोक त्यांनी अशाप्रकारे कापडावर विणले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद करण्याची मागणी

emirateslovesindia आणि otherground.with.sai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत सुमारे ७० हजार लोकांनी लाईक केले असून २५ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी हेमप्रभा आजींच्या कामाचे कौतुक केले आहे. एका यूजरने म्हटले की, त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. तर दुसर्‍या युजरने म्हटले की, त्यांचे नाव खरचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले पाहिजे.