पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच सोशल नेटवर्किंगवर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रीक व्होटींग मशिन्सविरोधात आवाज उठवला जात आहे. या निवडणुकीच्या प्राथमिक मतमोजणीचे कल हाती येण्याआधीपासूनच ईव्हीएमचा वापर करुन निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे असं म्हणणारा, #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार सायंकाळपासूनच #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग वापरुन ट्विट करण्यात येत आहेत. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच आज सकाळी आठवाजेपर्यंत या हॅशटॅगवर जवळजवळ ३५ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.


हा हॅशटॅग २६ व्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत आहे. पाहूयात काही व्हायरल ट्विट्स…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजपा या निवडणुकांकडे पूर्व आणि दक्षिणेकडील पक्षविस्ताराची संधी म्हणून पाहात आहे. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सातत्याने सांगितले होते की, लोकसभेच्या ३०३ जागा जिंकणे हा पक्षाच्या यशाचा कळस नव्हे. भाजपाला देशभर विस्तारण्यास वाव आहे, त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांच्या या मेहनतीला किती यश मिळेल हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election results 2021 ban evm save democracy trends on twitter scsg
First published on: 02-05-2021 at 09:09 IST