युट्यूबर व ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. रेव्ह पार्टी आयोजित करणं व त्या पार्टीत सापांचे विष पुरवणं या आरोपाखाली एल्विश यादवला अटक झाली होती. पाच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता, पण आता पोलिसांनी एल्विश व इतर सात जणांविरोधात १२०० पानांचं आरोपपत्र नोएडांनी पोलिसांनी सूरजपूर कोर्टात दाखल केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

एल्विश यादव गारुड्यांच्या संपर्क होता, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी काही पुरावेही गोळा केले आहेत. एल्विश केवळ गारुड्यांच्या संपर्कात नव्हता तर तो विष पुरवठा आणि खरेदीमध्येही सामील होता. पोलिसांनी याप्रकरणातील व्हिडीओ, कॉलचे डिटेल्स व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र तयार केलं आहे. यासोबतच एल्विशवर लावण्यात आलेल्या एनडीपीएस कलमांनाही आधार बनवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस फॉरेन्सिक मेडिसिन टॉक्सिकोलॉजी तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहेत.

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
aditi sarangdhar shares private ride bad experience
Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

‘गँग्स ऑफ वासेपूर’चा असिस्टंट डायरेक्टर अपघाती मरण पावला अन्…; हंसल मेहतांनी सांगितला मुलाच्या रुममेटचा ‘तो’ प्रसंग

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पीएफए ​​अधिकाऱ्याने एल्विशवर सापाचे विष पुरवल्याचा आरोप केला होता. नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही महिन्यांनंतर, १७ मार्च रोजी एल्विशला अटक करण्यात आली आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, पाच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला.

सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विशने व्हिडीओ बनवून आपण असा कोणताही गुन्हा केला नव्हता, असं सांगितलं होतं. आपल्याला फसवलं जात आहे, असंही त्याने म्हटलं होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी १२०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून पुढे एल्विशवर काय कारवाई होईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.