Astronauts Experience New Year 16 times in Space: संपूर्ण जगाने नवीन वर्षाचे (New Year 2024) स्वागत केले. त्याचप्रमाणे अंतराळातील अंतराळवीरांनी नवीन वर्ष २०२४ चे स्वागत त्यांच्या खास पद्धतीने केले. तुम्हाला माहीत आहे का की ISS वरील अंतराळवीर एका दिवसात एकूण १६ वेळा नवीन वर्ष पाहू शकतात. प्रत्यक्षात यामागचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS), जे पृथ्वीभोवती आपल्या अखंड कक्षेत खूप वेगाने फिरते, ज्यामुळे अंतराळवीर २४ तासांत सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही १६ वेळा पाहू शकतात.

नासाने हे रहस्य उघड केले आहे
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सुमारे २८,००० किलोमीटर प्रति तास या वेगाने दर ९० मिनिटांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या परिस्थितीमुळे अंतराळवीरांना एकाच दिवसात अनेक वेळा नवीन वर्षाचे स्वागत करण्याची अनोखी संधी मिळते. यूएस, रशिया आणि जपानमधील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर काम करत असताना, NASA ने म्हटले आहे की, टीम नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला १६ सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतील, प्रत्येक सलग सूर्यास्त ९० मिनिटांनी दिसतो. ‘स्पेस स्टेशन २४ तासांत पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. त्यामुळे अंतराळवीर त्यांच्या प्रवासादरम्यान १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतात.

Kalamboli, 8 thousand Electricity Consumers , Left Without Power , for Hours, Accidental Power Line Cut, kalamboli no electricity, kalamboli electricity cut,
कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

हेही वाचा – लग्न मंडपात सुरु होते विधी; नवरी बसल्या बसल्या पेंगत होती, नवरदेवाने…. Viral Video पाहून लोकांना आवरेना हसू

अंतराळवीर दिवसातून १६ वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतात

प्रत्यक्षात, पृथ्वीवर १२ तास प्रकाश आणि १२ तास अंधार असतो. याउलट अंतराळवीर ४५ मिनिटे दिवसाच्या प्रकाशात आणि त्यानंतर ४५ मिनिटे अंधारात घालवतात. हे चक्र दिवसातून १६ वेळा चालते, ज्यामुळे ISAA वर एकूण १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहता येतात. हे अंतराळ स्थानक हे १५ देशांतील पाच अंतराळ संस्थांमधील आंतरराष्ट्रीय भागीदारीचे परिणाम आहे, ज्यांनी ते चालवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. नासाच्या माहितीनुसार, सात चालकांचा गट सामान्यत: स्पेस स्टेशनवर राहतात आणि काम करतात, जे सहा बेडरूमच्या घरापेक्षा मोठे आहे. परंतु स्पेस स्टेशनवर अधिक लोक असू शकतात.

हेही वाचा – आजीला भेटायला निघाला होता ६ वर्षाचा मुलगा; एअरलाइन्सच्या चूकीमुळे पोहचला भलत्याच ठिकाणी, तेही १६० मैल दूर

२०१७मध्ये, यूएस अंतराळवीर पेगी व्हिटसनने स्टेशनवर सर्वाधिक वेळ, ६६५ दिवस किंवा जवळपास दोन वर्षे घालवण्याचा विक्रम केला. पृथ्वीवर दिवसा-रात्रीचे वारंवार होणारे बदल आपल्याला अनैसर्गिक वाटू शकतात, परंतु ही अनोखी घटना अंतराळवीरांसाठी एक वरदान आहे जे विविध सूक्ष्मजीवशास्त्र आणि धातूविज्ञान प्रयोग करण्यासाठी दिवस आणि रात्रीच्या बदलाचा वापर करून प्रयोग करू शकतात. पणे, विचित्र गोष्ट म्हणजे त्याची पृथ्वीवर प्रतिकृती होण्याची शक्यता नाही.