तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचं आहे. आजकाल कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमध्ये जाणाऱ्या मंडळींपर्यंत अनेकांना व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करायला आवडतं. तर आज सोशल मीडियावर व्यायामशाळेतील (GYM) एक पोस्ट व्हायरल होत आहे. पण, या व्हिडीओत तरुण मंडळी नाही, तर एक ८० वर्षांचे निवृत्त आयपीएस अधिकारी व्यायाम करताना दिसले आहेत.
कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते हे तर तुम्ही ऐकलंच असेल. तर वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ८० वर्षांचे निवृत्त आयपीएस अधिकारी एल. सी. अमरनाथन यांचे जिममध्ये व्यायाम करतानाचे ऑनलाइन फोटो शेअर करण्यात आले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी व्यायाम करण्याची जिद्द सोशल मीडियावर अनेकांना नकळत प्रेरणा देऊन जात आहे. तुम्हीसुद्धा बघा ही व्हायरल पोस्ट.
हेही वाचा…३१ डिसेंबरची रात्र Zomato साठी ठरली खास! डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली ९७ लाखांची टीप
पोस्ट नक्की बघा :
व्यायामशाळेत जिम ट्रेनर निवृत्त आयपीएस अधिकारी यांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत. तसेच यांच्या प्रशिक्षणानुसार अधिकारी सर्व प्रकारचे व्यायाम करत आहेत. त्यांनी तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यातील एका फोटोत बेंच प्रेस, तर दुसऱ्या फोटोत डंब-बेल आणि तिसऱ्या एबी मूव्हमेंट करताना दिसत आहेत. या दरम्यान त्यांची जिद्द, त्यांची ताकद अगदी स्पष्ट दिसून येत आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ‘याला म्हणतात प्रेरणा. हे ८० वर्षांचे एल. सी. अमरनाथन निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत’; अशी त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिली आहे. तसेच ही पोस्ट पाहून दिल्लीतील एका पोलिस आयपीएस अधिकारी यांनी, ‘आपण सर्वांनीच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे खरं रि-टायर लाईफ आहे; अशी त्यांनी कमेंट केली आहे.