देशात सर्वच शहरात दुचाकी वापरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार दुचाकी उपलब्ध करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहेत. तर बंगळुरू आधारित इलेक्ट्रिक दुचाकी बनवण्यात आघाडीवर असलेली वाहन निर्माता एथर (Ather) कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात लाँच करत असते. तर आज इलेक्ट्रिक दुचाकी एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक यांनी त्यांच्या एका खास ग्राहकांबद्दल सांगत पोस्ट शेअर केली आहे.

एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी एक्स (ट्विटर) वरून एक पोस्ट शेअर केली आहे. जयपूरमध्ये एका ग्राहकाने एथर एनर्जीची ४५० सीरीजची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली. पण, ही दुचाकी खरेदी करताना या ग्राहकाने रक्कम (कॅश), चेक किंवा इतर कोणतेही डिजिटल पेमेंट न करता १० रुपयाची नाणी देऊन ही दुचाकी खरेदी केली आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, दुचाकी खरेदी दरम्यान ग्राहकाबरोबर फोटो काढला आहे आणि टेबलावर प्लाटिकच्या पिशव्यांमध्ये दहा रुपयांचे अनेक नाणी बांधून ठेवली आहेत. एकदा पाहाच ही व्हायरल पोस्ट.

हेही वाचा…VIDEO: खेळण्यातील कार चालवून व्यक्तीने केला विश्वविक्रम; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

पोस्ट नक्की बघा :

जयपूरमध्ये एका व्यक्तीने एथर ४५० सीरीजची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली. तसेच ही दुचाकी खरेदी करताना या ग्राहकाने १० रुपयांच्या नाण्यांचा उपयोग केल्यामुळे एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी या ग्राहकाचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, काही दिवसांपूर्वी नवीन एथर मालकाने जयपूरमध्ये स्वत:साठी ४५० सीरीजची इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली. तेही सर्व १० रुपयांच्या नाण्यांसह; अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीनं एथर ४५० शहरी भागात चालवण्यासाठी बनवली आहे. ही स्कूटर ८० किमी प्रती तासाच्या वेगाने चालते असे कंपनीचे म्हणणे आहे. एथरच्या अधिकृत वेबसाइटनुसार एथर ४५० मॉडेलची किंमत एक लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. या वाहनामध्ये पार्क असिस्टंस, ऑटो-होल्ड, साइड-स्टेप, आणि स्टोरेज स्पेस यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.