एटीएममधून पैसे काढताना कोणालाही तुमच्या पर्सनल कार्डचा पिन नंबर किंवा त्यासंबंधित इतर कोणतीही माहिती शेअर करू नका, असे वारंवार सांगितले जाते. तरीही काही लोक अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवत तसे करताना दिसतात. विशेषत: एटीएममधून पैसे काढताना अनेकदा कार्ड मशीनमध्येच अडकून राहते. अशा वेळी काय करावे, कोणाला कॉल करावा ते सुचत नाही. असेच काहीसे एका तरुणीच्या बाबतीत घडले आणि तिची २१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.

नेमक प्रकरण काय आहे?

राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेज- १ येथील एका एटीएमधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या अपूर्व सिंग नावाच्या तरुणीची २१ हजार रुपयांची फसणूक झाली. पीडितेने एक्सवर घटनेची संपूर्ण माहिती दिली.

VIDEO : तरुणाने IPLच्या तिकिटासाठी मोजले ४५०० रुपये; स्टेडियममध्ये पोहोचताच घडले असे की…; पाहून व्हाल चकित

तिने पोस्टमध्ये लिहिले की, मयूर विहार फेज-१ जवळ एक एटीएम आहे. तिथे मी पैसे काढत असताना माझे डेबिट कार्ड मशीनमध्ये अडकले. मी माझ्या परीने प्रयत्न केला; पण कार्ड निघाले नाही. एटीएमच्या बाहेर एक व्यक्ती उभी होती. मी त्याच्याशी बोलले तेव्हा त्याने एटीएम मशीनच्या बाजूला असलेल्या भिंतीवर लिहिलेल्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने हा एजंटचा संपर्क असल्याचा दावा केला (9643935842).  मी त्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला असता, त्यांनी मला मशीनचा क्रमांक विचारला. त्यांनी मला जे काही सांगितले, त्यानंतर मशीन बंद झाली; पण कार्ड मशीनच्या आत अडकून राहिले.

यावेळी कस्टमर केअरला फोन केला तेव्हा त्यांनी आज रविवार आहे. मी तुमची काही मदत करू शकत नाही, असे सांगितले गेले. मी २० मिनिटे तिथे उभी होती. माझ्या डोक्यात सतत चालू होते की, माझे एटीएम कार्ड आता बाहेर कसे येणार. त्यानंतर माझ्या मोबाईलवर दोनदा ट्रांझॅक्शनचा मेसेज आला. माझ्या अकाउंटमधून २१ हजार रुपये काढण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर पीडितेने पुढे लिहिले की, मी पांडव नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यावेळी बँकेला मी काही मदत होईल का, असे विचारले होते. त्यावेळी मला सांगण्यात आले की, हे आमचे प्रकरण नाही. होम बँकेमध्ये तक्रार करा. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ही घटना घडली तेव्हा तेथे कोणीही गार्ड उपस्थित नव्हता. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.