अनेकांचा सर्वात चांगला मित्र म्हणजे कुत्रा. कुत्रा हा प्राणी अनेकांच्या घरात सोबत राहतात. दुःख आणि आनंदात तेही असतात. सोशल मीडियावर आपण अनेकदा कुत्र्यांचे व्हिडीओ शेअर करतो. नेहमी प्रमाणे आजही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने धैर्याने मालकाच्या मुलीला पाण्यातून वाचवले आणि सिद्ध केले की ते खरोखर निष्ठावंत,प्रामाणिक आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण कुत्र्याचे कौतुक करत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक लहान मुलगी समुद्राजवळ खेळत आहे, तेव्हाच एक कुत्रा तिथे उभा आहे. तेव्हा समुद्राची लाट खूप वेगाने येते आणि मुलीला भिजवते. हे पाहिल्यानंतर कुत्र्याला वाटते की मूल सुरक्षित नाही. अशा पस्थितीत तो ठरवतो की मुलीला पाण्यातून बाहेर काढावे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कुत्रा त्याच्या तोंडाने कसे तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो वारंवार तोंडाने ओढतो आणि तिला किनाऱ्यावरून जमिनीवर घेऊन जातो.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ thedodo या युट्युब चॅनेलवरून हँडलवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला एक मस्त कॅप्शन देण्यात आले आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर २० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओ लाईक केलं आहे. प्रत्येकाला हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?