एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत; ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते. अनेकदा प्रवासात रिक्षाचालकाला भैया या नावाने हाक मारली जाते. याच नावाला कंटाळून एका रिक्षाचालकाने प्रवाशांना एक विनंती केली आहे. त्याने आपल्या सीटमागे या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे; ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिक्षाचालकाने या पोस्टमधून खास मुलींना ही विनंती केल्याचे सोशल मीडिया युजर्सचे मत आहे. @naya नावाच्या एका ट्विटर युजरने त्या रिक्षातील विनंतीवजा सूचनेचा फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, आज मी ऑटोमध्ये हे पाहिले.

ट्रेन आहे की ५ स्टार हॉटेल! वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचमधील सुविधा पाहून व्हाल अवाक्; पाहा PHOTO

या पोस्टमध्ये रिक्षाचालकाने प्रवाशांना भैया म्हणून संबोधू नका, असे आवाहन केले आहे. त्याने भैया म्हणण्याऐवजी भाई, दादा, बॉस म्हणा, असेही सांगितले आहे. कारण- बऱ्याचदा लोक भैयाऐवजी भय्या असेही म्हणतात. जे रिक्षाचालकाला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याने ही खास विनंती केलीय. त्याची ही पोस्ट लोकांना फार आवडली आहे. लोक त्यावर कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिले की, भैय्याचे काही स्टॅण्डर्ड आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, मुलींकडून नेहमी भैया हे नाव ऐकून वैतागला होता. त्यावर तिसऱ्या युजरने म्हटले, बॉस पर्सनल आहे. तर काहींनी हा रिक्षाचालक नक्कीच मुंबई किंवा बंगळुरूचा असेल, असे म्हटलेय. कारण- रिक्षात अशा प्रकारची पोस्ट तिथलेच रिक्षाचालक लिहिताना दिसतात.