Auto rikshaw scam: तुम्ही देखील ऑटो रिक्षाने प्रवास करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ऑटो रिक्षाने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना चालकांचा मुजोरीचा सामना करावा लागतो. काहीवेळा मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांबच्या रस्त्याने घेऊन जाणे, कमी अंतरासाठी अवाच्या सव्वा भाडे आकरणे, विनाकारण वाद घालणे; अशा अनेक गोष्टींचा सामना प्रवासी करत असतात. रिक्षाने प्रवास करताना काहीवेळा असाही अनुभव येतो की, कापलेल्या अंतरापेक्षा मीटर अधिक वेगाने पळतेय. रिक्षा किंवा टॅक्सीनं प्रवास करताना आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. रिक्षाचा मीटर हा प्रमाणापेक्षा जास्त वेगानं धावतो. थोडं अंतर पार करताच अचानक आकडे विजेच्या गतीनं धावू लागतात. मात्र हल्ली ओला उबेर याद्वारेच रिक्षा टॅक्सी बूक केली जाते, जी थेट आपल्या घराबाहेर येते. यावेळी याचे भाडे आधीच ठरलेलंही असतं. तुम्हीही अशाप्रकारे प्रवासासाठी ओला उबेर ऑनलाईन बूक करत असाल तर तुमचीही फसवणूक होऊ शकते.

अनेकदा चालक मंडळी ग्राहकांसोबत फसवणूक करतात. अ‍ॅपवर दाखवलेल्या भाड्यापेक्षा अधिक पैसे वसूल करतात. असाच एक प्रकार बेंगळुरूमधील एका महिलेनं उघडकीस आणला आहे. या महिलेचं नाव आदिती श्रीवास्तव असं आहे. तिनं एक्सवर एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली. ही महिला रिक्षानं प्रवास करत असताना, २.६ किमीच्या अंतरासाठी मीटरवर भाडं फक्त ३९ रुपये आलं होतं. पण लक्षवेधी बाब म्हणजे, त्याच ठिकाणी तेवढ्याच अंतरासाठी अ‍ॅपवरून बुकिंग केल्यावर भाडं तब्बल १७२.४५ रुपये दाखवलं गेलं. हे झालं ऑनलाईनचं मात्र ऑफलाईनही अशी फसवणूक होऊ शकते.

बऱ्याचदा रिक्षाचं मीटर पाहू काही तरी गडबड आहे हे तुमच्या लक्षात येतं खरं… पण ही नेमकी गडबड काय आहे? हे काही आपल्या लक्षात येत नाही. परिणामी १०-१५ रुपयांसाठी भांडणं काय करायची हा विचार करून आपण दुर्लक्ष करतो. पण होय, तुमचा संशय खरा आहे. काही रिक्षांच्या मीटरमध्ये गडबड असते. असे रिक्षावाले तुमची फसवणूक करत आहेत. मीटरवर चुकीचे आकडे दाखवून ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल करतात. पण प्रश्न असा आहे, ही गडबड ओळखायची तरी कशी? रिक्षावाल्यांना रंगेहात पकडायचं कसं? तर रिक्षाचा मीटर सुरू असताना त्यामधील सर्व अंकांवर नीट बारकाईनं नजर ठेवा. विशेषत: पॉइंटच्या पुढे जे शून्य आकडे असतात त्यावर नजर ठेवा. त्या शून्यांच्या पुढे तुम्हाला आणखी एक पॉइंट ब्लिंक करताना दिसत असेल तर मीटरमध्ये गडबड आहे. लक्षात ठेवा त्या रिक्षाचा मीटर प्रमाणापेक्षा जास्त वेगानं धावणार. तो रिक्षावाला तुमच्याकडून अधिक पैसे वसूल करणार.

पाहा कशी केली फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे ओला-उबेर बूक करताना तुमची फसवणूक तर होत नाहीये ना हे काळजीपूर्व पाहा आणि सतर्क राहा.