Toilets In Ayodhya Video: लाइटहाऊस जर्नलिझमला अयोध्येतील निर्माणाधीन भारतीय शौचालयांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले आहे. हा व्हिडिओ अलीकडचा आणि अयोध्येचा असल्याचा दावा करण्यात आला होता. अयोध्येला भेट देणाऱ्यांसाठी व्यवस्था केली जात असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. उघड्यावरच भारतीय शौचालयांच्या दोन रांगा बांधण्यात आल्या आहेत. अगदी एकमेकांच्या समोरासमोर असणाऱ्या या रांगा बघून थक्क झाल्याचे अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. नेमकं हे प्रकरण काय हे सविस्तर पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Rajiv Tyagi ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला .

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यांसह समान व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक फ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला. असे केल्यावर, आम्हाला काही YouTube व्हिडिओ आढळले ज्यात व्हिडिओ वाराणसीचा असल्याचे नमूद केले होते.

यावरून हा व्हिडिओ वाराणसीचा असल्याचे संकेत मिळाले.

आम्हाला आणखी एक व्हिडिओ सापडला ज्याच्या हेडिंगमध्ये सदर व्हिडीओ ‘स्‍वरवेद मंदिर’ येथील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आम्‍हाला स्‍वरवेद महामंदिर धाम वाराणसी येथील ‘एएमटी यूट्यूबरचा’ व्‍लॉग दिसून आला, त्याचे उद्घाटन होण्‍यापूर्वी शौचालयांचे बांधकाम व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वाराणसीमध्ये स्वरवेद महामंदिर या सात मजली मंदिराचे उद्घाटन झाले होते.

हे ही वाचा<< राहुल गांधींनी कमळ हातात घेतलं अन्.. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चिखलातील फोटो चर्चेत, पण..

निष्कर्ष: स्वरवेद महामंदिर धामच्या उद्घाटनापूर्वी निर्माणाधीन शौचालयाचा व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील असल्याचे सांगून अलीकडेच शेअर केला जात आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.