सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुत्र्याचे कधी मांजरांचे, कधी प्राण्यांच्या शिकारीटे. कधी हे व्हिडीओ भयावह असतात तर कधी मजेशीर. तुम्ही सोशल मीडियावर हत्तींचेही अनेक व्हिडीओ पाहिले असती. नुकताच जंगलाती एका हत्तीला चक्क ड्रग्सची पिशवी सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू आहे.

प्राण्यांना प्रेमाची भाषा कळते असे म्हणतात. त्यामुळे प्राण्यांना जितका तुम्ही जीव लावता त्यापेक्षा जास्त प्रेम ते तुमच्यावर लावतात. असाच काहीसा प्रकार एका हत्तीच्या पिल्लाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीबरोबर घडला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हत्तीचे पिल्लू त्याच्या मित्राला उठवण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याला त्याच्या शेजारी झोपायचे आहे.

हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते,पाहा व्हायरल व्हिडिओ

हत्तीचे पिल्लू त्याच्या मित्राशेजारी झोपण्यासाठीआहे. हत्तीचे पिल्लू त्या मित्राच्या अंगावर लोळून त्याला उठवतो. त्याला बाजूला व्हायला भाग पाडतो आणि स्वत:तिथे झोपतो. आपल्या मित्राला झोपण्यासाठी थोडी जागा ठेवतो. थोड्यावेळाने त्याचा मित्र तेथे झोपतो. हत्तीच्या अंगावर चादर टाकतो. दोघांची मैत्री पाहून नेटकरी तक्का झाले आहे.

हेही वाचा – जंगलामध्ये हत्तीला सापडले ड्रग्ज, पुढे जे घडलं ते व्हिडीओमध्ये झाले कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्तीच्या पिल्लाचा आणि त्याच्या मित्राचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ tamizh_wifi_atti या इंस्टाग्राम अकांउटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडोओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, ”प्राण्यांचे प्रेम पवित्र असते” तर दुसऱ्याने लिहिले, ”मी अलीकडे पाहिलेली सर्वात गोंडस गोष्ट आहे” तर तिसऱ्याने लिहिले की, ”किती सुंदर आहे हे….अटीशिवाय प्रेम” तर चौथ्याने लिहिले की, ”हे ह्रदयस्पर्शी आहे.”