Viral Video Today: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नसला तरी इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक सर्वत्र या चित्रपटातील एक गाण्याची चांगलीच हवा होती. ‘बहराला हा मधुमास’ या गाण्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. या गाण्याची हुक स्टेप प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. अगदी वेगवेगळ्या वयातील, वेगळ्या देशातील, ज्यांना कदाचित मराठी भाषा समजतही नसावी त्यांनी सुद्धा या गाण्यावर भन्नाट रील्स बनवल्या होत्या. अशीच एक नवी रील सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. पण इतर सर्व रील्सपेक्षा या व्हिडिओची क्रिएटिव्हिटी वेगळ्याच स्तरावर भन्नाट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गाणं आणि अर्थ तोच असला तरी या सुंदर तरुणींनी बहरला हा मधुमास गाणं चक्क संस्कृत भाषेत सादर केलं आहे.

आली, सुमनसुवरभृङ्गाली! या शीर्षकासह @GandharvaSankhyam या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील नाट्य, संगीत व कलाविष्कार सादर करण्यासाठी हे अकाउंट काम करत असल्याचे आमचे लक्षात आले. हा व्हिडीओ बहराला मधुमास या ट्रेंडमध्ये बऱ्याच उशिराने म्हणजेच अगदी दोन आठवडे आधीच आला असला तरी इतर सर्व रील्सपेक्षा अधिक भाव खाऊन गेला आहे. या व्हिडिओवर शेअर केल्यापासून अनेकांनी कौतुक करत कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: ‘बहरला मधुमास’ संस्कृत व्हर्जन

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे.