Man Second Wedding Caught Due To Baldness: बिहारच्या गया मध्ये पहिली पत्नी जिवंत असताना एक व्यक्ती दुसरं लग्न करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची पहिली पत्नी मांडवात पोहोचल्यावर सर्वांना याबद्दल सर्वांना समजलं आणि त्यांनी नवऱ्याला बेदम मारायला सुरुवात केली. यादरम्यान, त्याने डोक्यावर घातलेला केसाचा विग पडला आणि टक्कल लपवण्याचं त्याचं ढोंग सुद्धा समोर आलं. या दुहेरी धोक्याने नवरी पुरती हादरून गेली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या इकबाल नगर येथील भागात घडल्याचे समजत आहे. स्टेजवर नवरा नवरी छान तयार होऊन बसले असताना नवरदेवाच्या पहिल्या पत्नीची एंट्री होते आणि मग अचानक हा सगळा तमाशा सुरु होतो. यावेळी नवरीच्या कुटुंबातील एक वृद्ध नातेवाईक तर अगदीच रागाने लाल होऊन नवरदेवाला मारहाण करताना दिसत होते. “आमच्या गावात आहेस म्हणून तुझा जीव घेत नाही, दुसरीकडे असतास तर मेलाच अस्तास: असेही काहीजण म्हणताना दिसत आहेत.

हे ही वाचा<< लोकलमध्ये असं भांडण कधीच पाहिलं नसेल! बायकांनी चप्पला, बुक्क्यांनी हाणामारी करताना लहानग्यालाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा प्रकार घडत असताना सुरुवातीला नवरा मुलगा हा सगळे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न करतो पण नंतर गत्यंतर नसल्याने त्याला त्याची चूक मान्य करावीच लागते. शिवाय मारहाणीच्या घाबरलेला नवरा मग नावरीकडच्या वर्हाडाची गयावया करून माफी सुद्धा मागू लागतो. या व्हायरल व्हिडिओची सध्या सोशल मिडीयावर तुफान चर्चा आहे. पोलिसांकडे संबंधितांकडून तक्रार नोंदवण्यात आली असून आता पोलीस याप्रकरणाचा तपास करत असल्याचे समजतेय.