जगभरातील अनेक लोक अगदी लहान वयात केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहेत. यामुळे केसगळतीवर अनेक उपाय शोधतात. यात हेअर स्पासह अनेक घरगुती उपाय केले जातात. परंतु काही करुन केसगळतीची समस्या कमी होत नाही. अशावेळी अनेकांना हेअर पॅच किंवा विगचा सहारा घ्यावा लागतो. या समस्येवर हजारो, लाखो खर्च करुनही काही फरक पडत नाही. यावेळी काहीजण याच समस्येवर हटके आयडिया शोधून काढतात. अशाच एका व्यक्तीने केस गळतीच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक असा उपाय केला आहे जो पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.
लाखो रुपये खर्च न करता अगदी स्वस्तात त्याने हा कायमचा उपाय केला आहे. मिररच्या वृत्तानुसार, डोक्यावर समोरुन टक्कल पडत असल्याने इटलीतील एका २६ वर्षीय जियानलुका तरुणीने हा उपाय केला आहे. जियानलुका केस गळतीच्या समस्येमुळे खूप त्रस्त होता. अनेक उपाय करुनही ही समस्या थांबवण्याचे नाव घेत नव्हती. अशा परिस्थितीत डोक्यावर केस नसलेल्या ठिकाणी केसांसारखा टॅटू काढला आहे. त्याने समोरच्या बाजून तिथे खूपच टक्कल दिसतोय तिथे ही केसांची एक झालर गोंदवली आहे. नकली केस वाढवण्यासाठी जेवढे पैसे लागतात त्यापेक्षा केसांसारखा दिसणारा टॅटू काढणे चांगले असे, त्याला वाटते. पण जेव्हा त्याने फायनल टॅटू पाहिला तेव्हा त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला.
Viral Video : आईच्या चप्पलची कमाल! कपाटात लपलेल्या हट्टी मुलाला दाखवता त्याने ठोकली धूम
गळलेल्या केसांच्या जागी काढला टॅटू
जियानलुकाने 30 वर्षीय टॅटू आर्टिस्ट मारिया जीना अल्टोबेली हिच्याशी संपर्क केला. यावेळी त्याने मारियाला आपल्या टक्कल पडलेल्या ठिकाणी केसांसारखा दिसणारा टॅटू काढायचा असल्याची विनंती केली. मारिआने जियानलुकाची विनंती मान्य करत टॅटू काढून दिला. हा टॅटू बनवण्यासाठी मारियाने तासंतास घालवले, ज्याचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. सुरुवातीला मारियाने जियानलुकीच्या टक्कलवर पेन्सिलने केसांसारख्या रेषा काढल्या. त्यानंतर टॅटूला अंतिम स्वरूप देण्यासाठी रेषांवर इंक लावण्यात आली. मारियाने त्याच्या डोक्यावर साधना कट सारखा टॅटू काढला होता. टॅटू काढल्यानंतर मारियाने त्याला आरसा दाखवला, जियानलुकीने जेव्हा आरसा पाहिला तेव्हा त्याला धक्काच बसला.
जियानलुकीने जसा विचार केला होता, तसा टॅटू काढला गेला नाही. त्यामुळे त्याला आनंद होण्याऐवजी पश्चातापच झाला. त्याला वाटले की, टॅटूचा इफेक्ट खऱ्या केसांप्रमाणेच दिसेल, पण तसे झाले नाही. जियानलुकीचा टॅटू खूपच वाईट दिसत होता. ज्यामुळे त्याचा संपूर्ण लुकच बिघडला.
हा टॅटू बनवल्यानंतर मारियाने सांगितले की, तिच्या क्लायंटला जसा लूक हवा होता, तसी मी करून दिला, यामुळे मारिया तिच्या कामावर आनंदी होती. पण जियानलुका या लूकवर फारसा समाधानी नव्हता.पण या टॅटूमुळे तो आता खूप व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे. बऱ्याच युजर्सनी कमेंट्स करत लिहिले की, आम्ही आशा करतो की हा टॅटू खोटा असेल, पण नसेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही.