No Guests After 10 PM: घर मालक आणि भाडेकरुंमध्ये वाद झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. भाडेकरुंना नेहमीच घर मालकाच्या बंधनात रहावं लागतं. अनेकदा घरमालकाला भीती असते की जर एखादा भाडेकरू त्याच्या घरात जास्त काळ राहिला तर तो कायमचा ताबा घेऊ शकतो. त्यामुळे तो भाडेकरुंवर अनेक बंधन लादत असतो. घरमालकाच्या अनेक अटी भाडेकरुंना गपगुमान मान्य कराव्या लागतात. बंगरुळमध्ये सध्या अशाच एका सोसायटीच्या नियमांची नोटीस व्हायरल होत आहे.

रात्री १० नंतर बाल्कनीतही नो एन्ट्री –

व्हायरल होणाऱ्या नोटीसमध्ये बॅचलर राहणाऱ्या मुलांवर वेगवेगळे नियम लावले आहेत. यामध्ये पहिला नियम असा की, कोणत्याही बाहेरच्या लोकांना किंवा पाहुण्यांना रात्री १० नंतर फ्लॅटमध्ये राहण्यास परवानगी नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या तुम्ही करु शकत नाही, एवढच नाहीतर स्वत:च्या बाल्कनीतही रात्री १० नंतर फोनवर बोलायची परवानगी या सोसायटीमध्ये नाही. पुढे त्या नोटीसमध्ये असं म्हटलंय की, असे आढळल्यास त्या व्यक्तीला दंड होऊ शकतो. या दंडाची रक्कम १००० इतकी असणार आहे. या सगळ्या अटींची चर्चा सध्या बंगरुळमध्ये सुरु आहे तर या नियमांची नोटीसही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय

पाहा पोस्ट –

हेही वाचा – video: नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं; गर्लफ्रेंडनं अंतर्वस्त्रातच ठोकली धुम

सोशल मीडियावर या नोटीसचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही याविरोधात संतापले असून अनेक प्रतिक्रिया देत आहेत. यातील एक युजरने यावर प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे की, आपण इथे राहयचे पैसे देतो त्यामुळे आम्ही काय करायचं हे आम्ही ठरवू. अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स यावर येत आहेत. @bangaloreblogger या अकाउंटवर ही नोटीस पोस्ट करण्यात आली आहे.