Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.हे व्हिडीओ कधी पोटधरून हसवतात तर कधी अवाक् करतात. सध्या असाच एका होमगार्डचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या असाच एका होमगार्डचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये होमगार्ड अनोख्या पद्धतीने डान्स स्टेप्स करत वाहतूक नियंत्रित करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बरेली शहरातील हा व्हायरल व्हिडीओ आहे. (Bareli Home Guard Controls Traffic With His Unique Dance Moves)
बरेलीचा एक होमगार्ड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे कारण काय तर वाहतून नियंत्रित करण्याची त्याची अनोखी शैली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बरेलीमध्ये या होमगार्डला वाहतूक नियंत्रित ठेण्यासाठी नेमण्यात आले पण हा होमगार्ड अनोख्या पद्धतीने वाहतून नियंत्रित करतो. डान्स स्टेप्स करत तो लोकांना जाण्यास आणि थांबण्यास सांगतो. त्याचा हा अनोखा अंदाज लोकांना खूप आवडला आहे. होमगार्डचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
बरेलीच्या ट्रॅफिक पोलिसांनीसुद्धा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या होमगार्डची फोटो शेअर करत लिहिलेय, “बरेलीमध्ये होमगार्ड दुर्गेश वशिष्ठ त्यांच्या अनोख्या अंदाजात वाहतूक नियंत्रित करत आहे”
पाहा पोस्ट
हेही वाचा : मुलांसह स्कुटीने रेल्वे रूळ ओलांडणार तितक्यात अडकले चाक, ट्रेन आली अन्… पुढे घडलं ते फार भयानक; पाहा VIDEO
होमगार्डच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह, खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “काम करण्याचा आनंद घेता आला पाहिजे. जर कामामध्ये आवड असेल तरच हे शक्य आहे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ट्रॅफिक पोलीस डान्स करत वाहतूक नियंत्रित करताना दिसले आहे. फेब्रुवारी महिन्यात असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये शिट्टी वाजवून नाही तर चक्क डान्स करत ट्रफिक पोलीस वाहतूक नियंत्रित करताना दिसला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी भर पावसात भिजत ट्रफिक पोलीस वाहतूक नियंत्रित करताना दिसला होता. त्या व्हिडीओची सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.