Viral video: सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे अनेक लोक आपले एखादे रील, व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी अनेक वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, स्वत:ला फेमस करण्याच्या नादात अनेकजण अशी काही कृत्य करतात ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. अशीच घटना प्रयागराजमध्ये घडलीये. दारूच्या नशेत कारमध्ये बसलेल्या अर्धनग्न तरुणांनी गोंधळ घातला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती भररस्त्यात गाडीच्या छतावर बसून दारूनं अंघोळ करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या घटनेची तीव्र निषेध नोंदवला आहे. तर सार्वजनिक ठीकणी अशी कृत्य करु नयेत असंही अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. शिवाय अशा स्टंटबाजांना अनेकवेळा चुकीच्या कृत्यांसाठी शिक्षाही भोगावी लागते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कारमधील काही तरुण सनरूफ उघडून एकमेकांवर दारू फेकत आहेत. सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असून गाडीच्या छतावर अर्धनग्न अवस्थेत नाचताना दिसत आहेत. यावेळी काही व्यक्तींनी त्यांची कृत्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली.

पाहा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ प्रयागराज रेल्वे स्टेशनच्या गेट क्रमांक २ चा आहे. येथे काही तरुण गाडीच्या छतावर बसून गोंगाट करत होते. यावेळी सर्व मद्यधुंद तरुणांनी अंगावरील कपडे काढून स्थानकाबाहेर गोंधळ घातला आणि डान्सही केला. याआधी हे सर्व तरुण वाटेत गाडीच्या छतावर बसलेले दिसले.

‘एकमेकांना दारूने आंघोळ घातली’

रस्त्याच्या मधोमध झालेला हा प्रकार कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमध्ये नशेत तरुण एकमेकांवर दारू फेकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जणू दारूने एकमेकांना आंघोळ घालतात. यानंतर या तरुणांनी हातात दारूच्या बाटल्या घेऊन पार्टीही केली.

हेही वाचा >> Lamborghini Car Fire Video: तेलंगानात गुंडांनी पेटवली ४ कोटींची लॅम्बोर्गिनी स्पोर्ट कार; पाहून मालकानं…

पोलिसांनी २४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर शहरात कलम १४४ लागू आहे. या सर्व प्रकारादरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे. आता या तरुणांवर कारवाई करत प्रयागराज आयुक्तालयाच्या शहागंज पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी २४ हजार ५०० रुपयांचे दंड ठोठावून कार जप्त केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.