Lamborghini Car Fire Video: ‘लेम्बोर्गिनी’ हे नाव ऐकताच आपल्या समोर चित्र उभं राहातं ते स्टायलिश स्पोर्ट्स कार. ही देशातील सर्वात प्रसिद्ध कार कंपन्यांपैकी एक असून ही कार तिच्या वेगासाठी ओळखली जाते. देशातील तरुणांमध्ये गाड्यांची एक वेगळीच क्रेझ आहे. आपल्याकडे पण ही कार असावी असं स्वप्न सामान्य तरुणही पाहत असतो. आपल्याकडे महागडी आलिशान कार असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. काहीजण आपलं स्वप्न पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात. तर काहींना आपलं स्वप्न अगदी सहज पूर्ण करता येतं. या कारची किंमत ८.८९ कोटी रुपयांपासून सुरू होते.

आता विचार करा याच कारला कुणीतरी आग लावली तर? ऐकूनच भुवया उंचावल्या ना…पण असं खरंच घडलंय. कर्जाऊ घेतलेली रक्कम परत न केल्याने चिडलेल्या काही गुंडांनी एका व्यवसायिकाची तब्बल कोट्यवधी रुपयांची स्पोर्ट कार पेटवून घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना तेलंगाना राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात येणाऱ्या बडंगपेठ येते घडल्याची माहिती आहे. माहितीनुसार, गुंडांनी पेटवलेली गाडी आलिशान लॅम्बोर्गिनी स्पोर्ट कार होती. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

४ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी जळून खाक

दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत पहाडीशरीफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग येथील व्यावसायिक नीरज याने लॅम्बोर्गिनी स्पोर्ट्स कार सेकंड हँड खरेदी (2009 मॉडेल डीएल09 सीव्ही 3636) केली होती. सध्या या नवीन कारची किंमत सुमारे चार कोटी रुपये असेल.

कारमालकाने काही लोकांकडून पैसे उधारीवर घेतले होते. उधारीवर घेतलेले ८० लाख रुपये परत न केल्याने आरोपींनी हे कृत्य केले. कार आगीच्या भक्षस्थानी पडलेली पाहून स्वत: पीडित व्यवसायिकाने स्वत:च फोन करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…

माहितीनुसार, पहाड शेरीफ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, तत्पूर्वीच कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. महेश्वरमचे एसीपी पी. लक्ष्मीकांत रेड्डी, पहाड शेरीफ इन्स्पेक्टर गुरुवा रेड्डी, एसएसआय मधुसूदन यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. कारमालकाने फिर्यादीनुसार पहाड शरीफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.