आपले स्वत:चे घर असावे, अशी प्रत्येकाचे स्वप्न असते. घर उभे करण्यापूर्वी त्याची दिशा, वास्तू रचना आदी गोष्टींबाबत सल्ला घेतला जातो. स्नानगृह आणि शौचालय बहुतांश घरात घराबाहेर किंवा खोल्यांशेजारी असते, मात्र युकेतील एका घरात चक्क बेडरूमच्या आत मध्यभागी स्नानगृह उभारण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

युकेतील एक घर १.६ कोटी रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे घर आलिशान आणि भव्य आहे. मात्र, यात एकच गोष्ट आहे जी तुम्हाला खटकू शकते. ती म्हणजे बेडरूमच्या मध्यभागी चक्क बाथरूम. कोणी आपल्या घरात असेही बदल करू शकते, असे तुमच्या मनालाही कधी शिवले नसेल, मात्र हे खरे आहे.

(ऑटो चालकाने महिलेला परत केले हरवलेले एअरपॉड्स, अत्यंत हुशारीने तिला शोधले, महिलेसह नेटकरी झाले चकित)

हे घर बर्मिंगहॅममध्ये आहे. या घराच्या बेडरूमध्ये मध्यभागी शॉवर असलेले स्नागृह आहे. रेबेका ग्लोवर नावाच्या महिलेला राइटमुव्ह नावाच्या संकेतस्थळावर तीन बेडरूम असलेले हे घर दिसून आले. खुळचटपणे डिझाईन केलेले हे घर गोर्डोन जोन्स इस्टेट एजेन्ट्सकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घर तसे सामान्य असून त्यात प्रशस्त लाउंज, मोठी मास्टर बेडरूम, बीम – सिलिंग स्वयंपाकघर, बाथरूम आणि बॅकयार्ड आहे. मात्र, एक बेडरूम अनोखी आहे. बेडरूमध्ये बॉक्स शॉवर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बाथरूमला असणाऱ्या पडद्यांमधून आतील सर्व काही दिसून येते. अहवालानुसार, हे घर विक्री झाले की नाही याची माहिती नाही. मात्र, या अनोख्या बेडरूममुळे हे घर चर्चेचा विषय ठरले आहे.