शहरापासून दूर जंगलातल्या एखाद्या अवघड वाटेवर मोकळा श्वास घेत आपल्या सायकलवर बसून तुम्ही सायकलिंगचा आनंद घेत आहात, आणि अशावेळी काळकुट्ट अस्वल जंगलातून बाहेर येत तुमच्या मागे धावत सुटलं तर? तुम्ही काय कराल? अहो ही कल्पना वगैरे अजिबात समजू नका. प्रत्यक्षात असं घडलंय, तेही दोन सायकलस्वारांसोबत. पण नशीब बलवत्तर म्हणून हे दोघेही अगदी थोडक्यात वाचले. अस्वलाच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा त्यांचा हा रोमांच सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ बघताना तुमच्या काळजाचा ठोका चुकला नाही तर नवल. दोन सायकलिस्ट जंगलात सायकलिंगचा मनमुराद आनंद घेत आपल्या धुंदीत चालले होते. पण या आनंदाचा भंग करणारी एक घटना घडली. अचानक या जंगलातून भलं मोठं अस्वल बाहेर आलं आणि एक सायकलस्वाराचा पाठलाग करू लागले. जर या चालकाचा सायकलवरचा वेग जराही कमी झाला असता तर अस्वलाच्या तावडीत ते नक्की सापडलं असतं पण नशीब बलवत्तर म्हणून तो आपली सायकल घेऊन निसटण्यात यशस्वी झाला. नाहीतर जंगलात भयानक प्रकार घडला असता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आतापर्यंत ९ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.