भारतीय टीव्ही मालिकांमध्ये काय दाखवले जाईल याचा नेम नाही असं मस्करीमध्ये म्हटलं जातं. अगदी भौतिकशास्त्र असो किंवा आरोग्य क्षेत्र असो भारतीय मालिकांमध्ये काहीतरी चमत्कारीक गोष्टी दाखवल्या जातात. नुकतीच अशीच एक गोष्ट समोर आली असून एका बंगाली टीव्ही मालिकेमध्ये एका रुग्णाला जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी चक्क स्क्रबरचा (घासणीचा) वापर केला. सध्या हा सीन व्हायरल झाला असून नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल झालेल्या या सीनमध्ये एक व्यक्ती रुग्णालयातील बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेली असून डॉक्टर त्याच्यावर इलाज करताना दिसत आहेत. हे डॉक्टर पीपीई कीट घालून दोन स्क्रबर एकमेकांवर घासून रुग्णाच्या छातीवर टेकवत त्याचा इलाज करताना दिसत आहेत. प्रामुख्याने कीचनमधील बेसिन किंवा बाथरुम साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या स्क्रबरचा हा वापर पाहून नेटकरीही हैराण झालेत. या सीनमध्ये डॉक्टर स्क्रबर एकमेकांवर घासून ते रुग्णाला शॉक देण्यासाठी वापरताना दिसत आहे. मात्र या स्क्रबरचे हिरव्या रंगाच्या हॅण्डलमुळे लगेच ही गोष्ट आरोग्य उपकरणांपैकी काही नसून स्क्रबर असल्याचे स्पष्ट होत आहे. याच भागातील काही स्क्रीनशॉर्ट सध्या ट्विटवर व्हायरल झाले असून ३६ हजारहून अधिक लोकांनी ते शेअर केले आहेत.

तुम्हाला हा भाग खोटा वाटत असेल ही घ्या युट्यूबवरील या भागाच्या प्रमोची लिंक

व्हायरल झालेला हा सीन झी बंगलाच्या ‘कृष्णाकोली’ या मालिकेतील आहे. “मी यांच्याबद्दल ठामपणे काहीच सांगू शकत नाही आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत,” असं डॉक्टर या सीनमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना सांगताना दिसत आहे. एखाद्या रुग्णाचे हृदय बंद पडल्यानंतर त्याला इलेक्ट्रीक शॉक देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिफिब्रीलेटर (defibrillator) ऐवजी मालिकेत स्क्रबर दाखवण्यात आले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटवर हास्याची कारंजी उडाल्याचे चित्र दिसत आहे. तुम्हीच पाहा ही व्हायरल ट्विट

१) डिग्री परत करवी म्हणतोय…

 

२) शिक्षणाची गरज

 

३) यांना काय कळणार

 

४) स्क्रबरने काय होणार?

 

५) मी पाच मिनिटं हसत होतो

 

६) वर्क फ्रॉम होमचा परिणाम

 

७) थेट कपड्यांवर

 

८) याला म्हणतात…

 

९) कलाकाराला काय वाटलं असेल?

 

१०) एवढ्या मोठ्याने हसलो की

 

११) काय बोलावं?

 

१२) नातेवाईकांना प्रवेश कोणी दिला?

 

१३) यासाठी केला असेल वापर

 

१४) करोनासाठी वापरला असणार

 

१५) तो मॉनेटर बघा

 

१६) स्वच्छ भारत अभियान

एकंरितच या ट्विटवरु १ हजार ८०० हून अधिक लोकांनी कमेंट करुन आपली वेगवगेळी मत मांडल्याचं दिसत असून अनेकांनी हा सीन खऱ्या अर्थाने एन्जॉय केल्याचं कमेंटवरुन पहायाला मिळत आहे.