काही लोक दारूच्या नशेत रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसतात, तर काही लोक सामान्य नागरिकांशी विनाकारण वाद घालतात. दारुड्यांचे असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अशातच आता बंगळुरूमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दारूच्या नशेत एक तरुणी भांडताना दिसत आहे. शिवाय यावेळी तिथे काही पोलीस भांडण मिटवण्यासाठी येतात तेव्हा ती त्यांनाही शिवीगाळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीटवर अनेक पब आणि नाईट क्लब आहेत, त्यामुळे या भागातील काही लोक दारू पिऊन कायदा मोडतात आणि रस्त्यावर गोंधळ घालताना आढळतात. रविवारी अशीच एक तरुणी दारूच्या नशेत पार्किंगमध्ये गेली असता तिचे तेथील लोकांशी भांडण सुरु झाले. पोलिसांनी नो पार्किंगमध्ये ध्ये उभी केलेली कार पार्किंगमध्ये नेण्यास सांगितल्यावर तिने चक्क पोलिसांशी बाचाबाची करायला सुरुवात केली. पोलिसांशी वाद घालत असताना ही तरुणी इतर लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. तिथे उपस्थित लोक या तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती.
हेही वाचा- रात्रीत पालटलं नशीब! घर साफ करताना वडिलांची ६० वर्षांपूर्वीची रद्दी सापडली अन् बनला करोडपती
दरम्यान, या तरुणीवर गुन्हा दाखल झाला की नाही हे समजलं नाही. परंतु दारुच्या नशेत पोलिसांशी गैरवर्तन करणे किंवा नो-पार्किंग झोनमध्ये वाहन चालवल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, या तरुणीने हायव्होल्टेज ड्रामा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिलं, “या महिलेला धडा शिकवला पाहिजे की, ती स्वत:च्या पैशाने दारू पीत असेल पण तिने लोकांना विकत घेतले नाही.” दुसऱ्याने लिहिलं, “दारुच्या नशेत गोंधळ घालण्याची हिंमत महिलांमध्ये कुठून येते?” तर तिसऱ्याने, “पोलीस या महिलेवर कडक कारवाई करणार का?” असा प्रश्न विचारला आहे.